राष्ट्रीय महामार्ग वर शिवशाही बस ने घेतला पेट
सोनोरी जवळ घडली घटना, सुदैवाने प्राणहानी टळली
प्रतिनिधी- संतोष माने
मूर्तिजापूर
शिवशाही बस पेट घेण्याच्या घटनेत सतत वाड होत असुन आज दुपारी 4वाजेदर्म्यान अकोला कडे जाणारी शिवशाही बसने पेट घेतल्याच्या घटनेचे माहिती मिळताच न पा चे अग्निशमन दल तत्काल घटनास्थळी पोहचून शिवशाही बसच्या मागच्या चकाने पेट घेतलेले विझवून आग आटोक्यात आणली सुदैवाने प्राणहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार शिवशाही बस क्रमांक M H 09E M 1483ही अकोला कडे प्रवासी घेवून जात असता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53वर असलेला सोनोरी जवळील मदरसा जवळ बसच्या मागच्या चाकाने पेट घेतल्याच्या चालकाच्या लक्षात येताच तत्काल प्रवाशियाना सुखरूप खाली उतरुन पाहणी केली असता मागच्या चाकाचे ब्रेक लायनर घासल्याने जाम होवून स्पर्किंग झाल्याने पेट घेतल्याने स्पष्ट झाल्याने तत्काल स्थानिक न पा च्या अग्निशमन दलास पाचारण केले असता अग्निशमन दलाचे राजु जवंजाल, अब्दुल आसिफ, अब्दुल सलीम व तिलक टाक यांनी तत्काल घटना स्थळी जावून सदर लागलेली आग आटोक्यात आणून विझविण्याचे अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या