मोठ्या राम मंदिरात श्रीराम ध्वज विशेष पूजन पादुका पूजन
शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्राचा भव्य दिव्य मंदिर अयोध्या येथे स्थापना होऊन प्रभू रामचंद्राच्या जीवनातून अनेक गुण अंगीकार करू शकतात मनुष्याच्या जीवनामध्ये येणारे सुखद आणि दुःख याचा सुरेख वर्णन संत तुलसीदासजींनी केला आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रभू रामचंद्राचा रामराज्य स्थापनेच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू असून सनातन प्रेमी जागृत होत आहे ही गौरव व स्वाभिमान स्वाभिमान बाब असल्याचे, प्रतिपादन अनिल मानधने यांनी केले.
संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिरात श्रीराम ध्वजा विशेष पूजन पादुका पूजन व प्रत्येकाच्या मनात प्रभू रामचंद्र भक्तीमय व जीवनामध्ये येणारे दुःख अंधकार दूर करण्यास प्रकाश निर्माण होण्यासाठी कुंभमेळाचा शुभारंभ तसेच पुत्रदा एकादशी शुक्रवार सर्वांमध्ये मित्रता बंधुभाव निर्माण व्हावा या दृष्टीने श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व रामनगर मित्र मंडळ यांच्या वतीने सामूहिक 101 हनुमान चालीसा चा पठाण करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने विशेष पूजा अर्चना करून अकोला पंचकोशीतील नागरिकांचा कल्याण व्हावं ही भावना व्यक्त करण्यात आली वेदपाठी ब्राह्मण संतोष शुक्ला चेतन शर्मा, वैभव राज्य वैद्य, कल्पेश शर्मा जनक जोशी, कनक शर्मा जनक शर्मा, दीपक शर्मा चंद्रशेखर खडसे राधेश्याम शर्मा यांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना करण्यात आली.
यावेळी सामूहिक पूजन करून प्रसाद महाआरती करून अकोला शहरातील राम मंदिरांमध्ये श्री प्रभू रामचंद्राचा सहा फुटी ध्वज देण्यात आला. श्री राम हरिअर संस्था चे उपाध्यक्ष विजय अग्रवाल यांच्याकडे ध्वजासमृत करण्यात आली.
यावेळी गिरीश जोशी यांच्या शुभहस्ते विशेष पूजा अर्चना करण्यात आली यावेळी श्रीराम जानकी पादुका यांचा अभिषेक पूजा अर्चना करण्यात आली. यामध्ये गिरीराज तिवारी, माधव मानकर राम अग्रवाल हर्ष मिश्रा भोला अग्रवाल देवदत्त दिनोदिया, मोहित अग्रवाल गोपी शर्मा आदित्य शर्मा नैतिक शर्मा मोहित शर्मा रामभाऊ सुरते राम अग्रवाल, अजय गुल्हाने, जितेंद्र गोयल , आधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जय श्रीराम या महामंत्राचं हे तेरा अक्षर स जप करण्यात आलं विशेष पूजा अर्चना करून श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीने सुंदर कांड व दीपकांची आरस मध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा सर्वांना विनंती आव्हान करण्यात आली.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या