हिंदू स्मशानभूमीत हिंदू व्यतिरिक्त समाजाला अंत्यविधीची परवानगी देऊ नये........! नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन सादर
मुर्तीजापुर: शहरातील स्टेशन परिसरातील पारदेश्वर मंदिराजवळील सकल हिंदू समाजासाठी राखीव असलेल्या हिंदू स्मशान भूमीत इतर समाजाने दफनविधीचा कार्य केल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहे.यावर नगर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. असे निवेदन तक्रारकर्त्यांनी मुर्तीजापुरचे नगर परिषद मुख्याधिकारी शेषराव टाले यांना देण्यात आले आहे.शहरारातील स्टेशन विभागातील सकल हिंदू समाजाची स्मशानभूमी ही हिंदू धर्मीयांसाठी राखीव असताना. विशिष्ट समाजातील लोकांनी दिनांक १५/१/२५ रोजी विशिष्ट समाजातील मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दफनविधी करत आहे.आज एकाने केले तर उद्या दुसरेही करत राहणार त्यामुळे हिंदू लोकांना तेथील स्मशानभूमीची जागा कमी पडेल यावर नंतर कोणताही तोडगा निघणार नाही. त्यात इतर समाजात तेढ निर्माण होवून कायदा सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
याकडे नगर प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्टेशन परिसरातील पारदेश्वर मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीत हिंदूधर्मा व्यतिरिक्त कोणत्याही समाजातील दफनविधी करण्यापासून थांबवण्यात यावी. प्रत्येक समाजासाठी शासनाने दफनविधी भूमी राखीव दिली असताना. हिंदू मशानभूमीतच एका विशिष्ट समाजाने दफनविधीचा कार्य करण्याचा मज्जाव केला आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेला आहे. असा प्रकार नेहमीच घडत असेल तर नगरपालिका प्रशासना विरोधात सकल हिंदू समाज मोठे आंदोलन उभारू शकते. या स्मशानभूमीत विशिष्ट समाजातील लोकांनी मृतदेह दफनविधी करून सकल हिंदू समाजाच्या स्मशानभूमीवर एक प्रकारचे अतिक्रमणचं केल्यासारखे झाले आहे. हिंदू स्मशान भूमीत झाला प्रकार हा जनसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.निवेदन देते वेळी आनंद देविदास बांगळ,राहुल भुजंगराव यदवर,चेतन अरुणराव सदार, रवी मारकड,निखिल पाल,अतुल लाटा,राजेश शेगावकर,दुर्गाताई मोहिते, प्रसाद धारपवार, चेतन पवार अजय बरडे, कुणाल बयस इत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या