चायनीज मांजाने अकोल्यात तिघे जखमी
प्रतिनिधी- नौशाद पटेल
अकोला
आज 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी चायनीज मांजाने अकोला शहरात खळबळ उडाली आहे. सकाळपासून पतंग उडवीण्याच्या मस्तीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दादाराव अनिल, रा. वानखेडे मलकापूर, शिलोक संतोष इंगळे, रा. कैलास टेकरी आणि सुमित गायकवाड अशी त्यांची नावे आहेत. हे खडकीचे रहिवासी आहेत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आज गरज असेल तरच बाहेर जा आणि शक्य तितक्या सावकाश आणि सावधगिरीने गाडी चालवा
0 टिप्पण्या