Ticker

6/recent/ticker-posts

पुन्हा एक लाख लक्षांक सोयाबीन खरेदी करण्याचा आदेश, आमदार सावरकर यांच्या प्रयत्नांना यश

पुन्हा एक लाख लक्षांक सोयाबीन खरेदी करण्याचा आदेश, आमदार सावरकर यांच्या प्रयत्नांना यश 


अकोला 
संपूर्ण देशात सर्वात जास्त सोयाबीन खरेदी करणारा राज्य महाराष्ट्र असून शेतकऱ्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण सातत्याने असून राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या विकासासाठी व त्यांच्या समस्या निराकारण्यासाठी कटिबद्ध असून त्यांचे सहकारी नामदार अजित दादा पवार नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे चालत असताना अकोला जिल्ह्यातील चार दिवसापूर्वी आमदार रणधीर सावरकर यांनी सोयाबीन खरेदीचा लक्षांक एक लाख करण्याचा मागणी केली होती ती पूर्तता केल्यानंतर आता रेकॉर्ड ब्रेक खरेदी झाल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांची मागणी आल्यावर आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे साकडे,, घातल्यावर अवघ्या अर्धा तासात एक लाख लक्षांक सोयाबीन खरेदी करण्याचा आदेश देण्यात आला आहे तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार नामदार एकनाथ शिंदे नामदार जयकुमार रावल यांच्याकडे भाजपा प्रदेश सरचिटणीस व विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी मुदतवाड, सोबत तीन लाख पुन्हा लक्षाक, वाढवून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस दिल्ली येथे असून ते केंद्रीय मंत्री नामदार शिवराज सिंग चव्हाण यांची भेट घेणार असून सोयाबीन खरेदीची मुदत वाढ सोबत लक्षांक वाढवण्याची मागणी करणार आहे. दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस गेल्यावर सुद्धा त्यांचे लक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे असून अकोला जिल्ह्यात अवघ्या सहा दिवसात दोन लाख लक्ष ंक सोयाबीन खरेदीचा आदेश देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे त्यांनी कृतीने सिद्ध केले आहे तमाम विदर्भातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांनी महायुती सरकारचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.


अकोला जिल्‍ह्यासाठी आज पुनश्च दुसऱ्यांदा सोयाबीन खरेदी करीता १.०० लक्ष क्विंटल वाढीव लक्षांक मंजूर केल्याची माहिती आमदार रणधीर सावरकरांनी दिली,
शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या सर्व सोयाबीनची खरेदी शासनाने करावी अशी मागणी आमदार रणधीर सावकरांनी शासनाकडे कायम लाउन धरली आहे, 

अकोला जिल्‍ह्यासाठी ४-५ दिवसापूर्वी १.०० लक्ष क्विंटल सोयाबीन खरेदी लक्षांक वाढवून देण्यात आला होता परंतु सदर लक्षांक संपुष्टात आल्यावर आज पुनश्च १.०० लक्ष क्विंटल लक्षांक शासनाकडून मंजूर करण्यात आला असे आमदार रणधीर सावरकरांनी सांगितले आहे, आज पुन्हा या करीता नाफेड महाव्यवस्थापक, यांना तातडीने सुचना देण्यात यावी अशी मागणी राज्याचे पणन मंत्री मा. जयकुमार रावल यांना रणधीर सावरकर यांनी केली होती,


 जिल्ह्याकरिता वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात येईल अशी ग्वाही मा. पणन मंत्री यांनी आमदार रणधीर सावरकर यांना दिली होती,
 जिल्हात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन उत्पादक शेतकरी असुन शासनाने सर्व सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे, असे रणधीर सावरकरांनी मा. पणन मंत्री यांना स्पष्ट केले आहे, तसेच फेब्रुवारी २०२५ अखेर पर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी पुनश्च मागणी आमदार रणधीर सावरकरांनी राज्याचे मूख्य मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस तसेच पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या कडे केली आहे,


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या