Ticker

6/recent/ticker-posts

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या शकुंतला नागापुरे परतल्या घरी सुखरूप

प्रयागराज महाकुंभ मेळ्यात हरवलेल्या शकुंतला नागापुरे परतल्या घरी  सुखरूप 


अकोला
प्रयागराज महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्या निमित्त मंगळवारी रात्री उशीरा 'संगम नोज' परिसरात अचानक चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अकोल्यातील डाबकी रोड गजानन महाराज मंदिर परिसरातील महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना तेथील एका पोलीस कॉन्स्टेबलने घरी परतण्यासाठी खुप मदत केली असल्याचे शकुंतला नागापुरे यांनी सांगितले.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा कुशल प्रबंध कुंभमेळ्यात असल्याचा प्रत्यय आला आहे. अकोल्यातील जुन्या शहरातील शकुंतला ताई नागापुरे हे कालपासून बेपत्ता होत्या आपल्या सोबत असलेल्या लोकांपासून हरवील्या गेल्या.  वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्यांचा शोध घेतला असता त्यांचा पत्ता लागत नव्हता परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी व रेल्वे पोलिसांनी त्यांना भुसावल रेल्वे मध्ये बसून अकोल्याला रवाना केलं आणि मध्यरात्रीच्या दरम्याध त्या सुखरूप घरी पोहोचल्या आहेत. हा योगी आदित्यनाथ यांच्या कुशल प्रबंधाचा आणि महत्वाची भुमीका बजावणारे म्हणजेच पोलीस प्रशासन कशा पद्धतीने मदत करते याचा हा अनुभव बघावयास मिळाला आहे.


अकोला 
 बारा वर्षांनी प्रयागराज इथे भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या भक्तांच्या सोयीसाठी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधी 12 रेल्वे गाड्या अकोल्यावरून येणे जाण्यासाठी सुरू केल्यानंतर आज मोनी अमावस्याच्या दिवशी रात्री दीड वाजता अफवांमुळे झालेली घटना च्या संदर्भात खासदार अनुप धोत्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर पालकमंत्री नामदार आकाश फुंडकर हे सातत्याने भक्त आणि प्रशासनाची संपर्क मध्ये होते. अकोला शहरातील जुन्या शहरातील राज राजेश्वर आरती मंडळाच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी दर्शनाला गेलेल्या शकुंतला ताई नागापुरे या जुन्या शहरातील महिला सेक्टर सेक्टर दोन मधून हरवल्यामुळे यांचा शोध घेण्यासंदर्भात आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कंट्रोल रूम मध्ये संपर्क करून तसेच प्रयागराज येथील ड्युटी ऑफिसर दीपक चौधरी यांच्या माध्यमातून शोध घेण्याचा व त्यांच्यासोबत असलेल्या परिवारांची संवाद साधून त्यांचा शोध घेण्यासंदर्भात सूचना दिली आहे सातत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा विवाह व भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर या संदर्भात संवाद साधत आहे


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या