Ticker

6/recent/ticker-posts

आ. सावरकर यांच्या गोसेवा गोभक्तांच्या वेगवेगळ्या गोशाळांना भेटी

आ. सावरकर यांच्या गोसेवा गोभक्तांच्या वेगवेगळ्या गोशाळांना भेटी 


अकोला 
नवीन वर्ष नवीन आकांक्षा नवीन संकल्प जनतेला समर्पित वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन वर्षातला दिवस सकाळी सहा वाजता पासून वेगवेगळ्या समस्या निराकरणासाठी संकल्पित होऊन सत्तेचा वापर लोकहितार्थ करण्याचा व जनतेला न्याय मिळवून देण्याचा हा संकल्प घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी आज धर्मअध्यात्म सोबत मानवता, आरोग्य सेवा, गोसेवा, व्यापाऱ्यांच्या समस्या, कार्यकर्त्यांची संवाद, विविध पीडितांना वंचितांना आधार देण्याचा काम, सामाजिक आणि व्यक्तिगत समस्या निराकरण करण्यासाठी संपूर्ण दिवस देऊन नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून जन समस्या समाधान करण्याचा प्रयत्न सुरू केला. 


आज सकाळी जनता दरबाराच्या माध्यमातून गोसेवा गोभक्तांच्या वेगवेगळ्या गोशाळांना भेटी आदर्श गोरसेला गोसेवा तसेच कानशिवनी येथील गोसेवा भेट देऊन वाघमारे प्रकाश भाऊ यांच्या कामकाजाची प्रशंसा करून अकोला मेन हॉस्पिटल मधील रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच धान्य बाजारातील व्यापारी च्या समस्या जाणून घटनास्थळी जाऊन सगळ्या व्यापाऱ्यांची संवाद साधून त्यांच्या अडचणी प्रशासनाचे अडचणी जाणून घेऊन त्याच्यातून मार्ग काढण्याचा तसेच जाजू मार्केटमधील व्यापाऱ्यांची संपर्क, डॉक्टर लोकांशी संवाद, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची संवाद लोकनेते आमदार गोवर्धन शर्मा यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाला भेटी देऊन पीडित वंचितांना आधार देण्याचं काम आमदार रणधीर सावरकर यांनी आज केलं. आपले सहकारी माधव मानकर विवेक भरणे प्रशांत अवचार डॉक्टर म्हणतकिशोर मालोकार, दादाराव पेठे, मधुकर पाटकर, पंकज वाडी वाले अनिल गावंडे, संदीप गावंडे, डॉक्टर अमित कावरे अंबादास उमाळे, यांच्यासोबत जाऊन पाहणी केली श्री गोपाल कृष्ण गोसेवा अनुसंधान केंद्राला भेट दिली आदर्श गोसेवा अनुसंधान केंद्राला भेट दिली तसेच आमदार गोर्धन शर्मा यांच्या स्मृतिपित्त प्रभात पाच मधील विविध कार्यक्रमाला भेट दिली वंचितांना आधार देण्याचे काम केले.
नवीन वर्ष सरकारचा लाभ सर्वसामान्यांना मिळून जायचा मतदार हा केंद्रबिंदू मानून त्याच्या समस्या निराकरणासाठी सदैव कार्यरत राहण्याचा संकल्प घेऊन अकोला शहरातील विविध ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा संकल्प घेऊन कामाला सुरुवात केली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या