अकोल्यात अडीच लाख रुपये किमतीचा गांजा जप्त
अकोला
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री नगर भागात दिलशाद खॉ हसीब खॉ (वय २३) हा मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री करीत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी १० किलो २२ ग्रॅम गांजा जप्त केला. २ लाख ५५ हजार पाचशे रुपये या गांजाची किंमत आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
आज दिनांक ३१/१२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला हद्दीतील शास्त्री नगर भागात एक इसम मोठ्या प्रमाणात गांजा विकी करिता बाळगुन आहे अशा माहितीवरून रेड करून आरोपी नामे नाव दिलशाद खाँ हसीब खाँ, वय ३३ वर्ष, रा. ग्राम डोरीया पोस्ट चन्नी ता. बायसी जि. पुर्णिया राज्य बिहार ह.मु. चारूलता काळे मेमोरियल आय.एम.ओ. हॉल चे समोर अकोला हा अंमलीपदार्थ गांजा स्वतः जवळ बाळगतांना मिळुन आल्याने त्याचे जवळुन एकुण १० किलो २२ ग्रॅम गांजा कि.अं. २,५५,५००/ रू चा जप्त करण्यात आला वरून आरोपी विरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण स्थानिक गुन्हे शाखा अकोला व पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, राजपालसिंह ठाकुर, गणेश पांडे, सुलतान पठाण, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, वसिमोद्दीन, प्रशांत कमलाकर, अक्षय बोबडे, अन्सार अहमद, स्वप्निल खेडकर, आकाश मानकर, अभिषेक पाठक, भिमराव दिपके यांनी केली आहे.
0 टिप्पण्या