दोन भंगार व्यवसायिकांमध्ये आपसी वादातून भांडण, एक जण गंभीर
प्रतिनिधी- नौशाद पटेल
अकोला
वाशिम बायपास परिसरात भंगार व्यवसायिकामध्ये जुन्या आपसी वादातून एका भंगार व्यवसायिकावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. यामधे अब्दुल नदीम अब्दुल मोबीन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वादा दरम्यान त्यांचा ऑटो सुद्धा फोडून नुकसान करण्यात आले आहे. अब्दुल नदीम यांनी काही दिवसांपूर्वी जुने शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती, त्यानंतरही त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचे सूत्रांकडून समजले, सदर हल्ला प्रकरणे पुणे शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असल्याचे कुटुंबीयांनी सांगीतले आहे, सदर प्रकरणी जुने शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0 टिप्पण्या