अभ्यासासोबतच इतर क्षमतांवर भर देण्याकरिता मनूताई कन्या शाळेत क्रीडा महोत्सव साजरा
अभ्यासासोबतच खेळालाही जीवनात महत्त्वाचे स्थान असले पाहिजे. तेव्हाच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मनुताई कन्या शाळेत क्रीडा प्रमुख श्रीमती मांगे व श्री मालवे यांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवून तसेच कै. मनुताई बापट यांच्या पुतळ्यास हारार्पण करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून मुलींचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ऐश्वर्या ताई धारस्कर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा सौ पल्लवीताई कुलकर्णी ह्या अध्यक्षा म्हणून लाभल्या तर अतिथी म्हणून अकोला शहरी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री गोपाल सुरे सर उपस्थित होते.तसेच मंचावर लेडीज होम क्लास सोसायटीचे सल्लागार आदरणीय श्री. अनिरुद्ध चौधरी सर व शाळा समितीच्या अध्यक्षा आदरणीय सौ दीप्ती ताई गदाधर मॅडम उपस्थित होत्या . विद्यार्थिनींनी बनविलेले कागदी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुलींच्या अंगी असणाऱ्या विविध कलागुणांना वाव मिळण्याकरिता कवायतींचे प्रदर्शन मान्यवरांसमोर करण्यात आले . विद्यार्थिनी स्वसंरक्षणासाठी सज्ज राहाव्यात याकरिता शाळेमध्ये लाठीकाठी चे प्रशिक्षण दिल्या जाते. आणि त्याच प्रशिक्षणावर आधारित लाठी काठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींनी मान्यवरांसमोर करून दाखविले. त्याचबरोबर लेझीम, डंबेल्स घुंगुर काठी ,योगा ड्रिल्स, टाळ अशा प्रकारच्या विविध कवायतींद्वारे मान्यवरांचे मन भारावून गेले. या सर्व कवायतींसाठी विद्यार्थिनींना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून यावेळी शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे विजेते तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया अंतर्गत पार पडलेल्या स्पर्धांमधील वयोगट 14 मधील विजयी स्पर्धक *कु.मयुरी बावणे कु. वैष्णवी जगताप कु. सानिया इंगळे कु.तानिया इंगळे* यासह इतरही विजेत्यांना त्यांच्या पालकांसह सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आणि या स्पर्धांसाठी श्रीमती मांगे मॅडम यांचे मुलींना मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. पल्लवीताई कुलकर्णी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना खेळा ,खेळामुळे शारीरिक संपदा वाढीस लागते असे सांगून विद्यार्थिनी खेळासाठी प्रवृत्त होतील अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री गोपाल जी सुरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींचे व शाळेचे भरभरून कौतुक केले . कार्यक्रमाला सकाळ पेपरच्या तीन जिल्ह्याच्या संपादिका, योग शिक्षिका सौ.वनिता कदम ,कु. भटकर मॅडम यांची तर कराटे चीफ श्री विजय पचांगे सर यांची सुद्धा उपस्थिती लाभली. वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, पत्रकार, पालक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शाळेतील शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा प्रमुख श्रीमती मांगे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या