Ticker

6/recent/ticker-posts

सैयद मोहसीन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिवणी येथे शिक्षक -पालकसभा आयोजित

सैयद मोहसीन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिवणी येथे शिक्षक -पालकसभा आयोजित



पातूर: 9 डीसंबर 2024 यंग मुसलीम एज्युकेशन ॲड सोशल वेलफअर सोसायटी पातुर व्दारा संचालित सैयद मोहसीन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिवणी येथे आज सोमवार , दिनांक 9 डीसंबर 2024 रोजी संस्था अध्यक्ष सैयद मुजाहिद इक्बाल व सचिव सैय्यद अकबर अब्दुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक -पालकसभेचे आयोजन करण्यात आले.या पालकसभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सैयद मोहीब इकबाल होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सैयद नसीमोद्दीन अब्दुल सलाम शेख शकील नजीर खान व पालक उपस्थित होते.या. या सभेचे प्रास्ताविक शाळेचे सहाय्यक शिक्षक असीमोद्दीन यांनी केले. त्यांनी या सभेचे उद्दिष्ट व हेतू पालकांसमोर मांडले.तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही पालकांना दिली.सहाय्यक शिक्षक शमशेर खान यांनी विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या सामान्य व शैक्षणिक कमतरतांकडे पालकांचे लक्ष वेधले. तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या तयारीसंदर्भात पालकांची जबाबदारी यावरही त्यांनी भर दिला.आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे पालन, सततची अनुपस्थिती, गणवेशाचे पालन, किरकोळ कारणांनी शाळेला सुट्टी घेणे, घराचे काम(होम वर्क)नियमित करणे आणि विद्यार्थ्यांच्या वह्या व पुस्तकांचे पालकांनी निरीक्षण करणे किती महत्त्वाचे आहे, यावर जोर दिला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व नैतिक प्रगतीसाठी पालकांनी आपल्या पाल्यासाठी वर्गशिक्षकांशी सातत्याने संपर्कात राहून प्रत्येक विषयाचा शैक्षणिक अहवाल मिळवण्याचे आवाहन त्यांनी केले.


कार्यक्रमाच्या शेवटी सहाय्यक शिक्षक मोहम्मद अनवारोदीन यांनी शाळा व्यवस्थापन व शाळेच्या वतीने सर्व पालकांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परीश्रम घेतले


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या