Ticker

6/recent/ticker-posts

2024 वर्षातील शेवटचा पाऊस, आज सकाळ ते रात्री दरम्यान राहणार पाऊस

2024 वर्षातील शेवटचा पाऊस, आज सकाळ ते रात्री दरम्यान राहणार पाऊस 

अकोला
आज अकोला जिल्ह्यात पहाटे चार वाजता पासून पावसाला सुरुवात झाली आहे. 2024 वर्षातील हा शेवटचा पाऊस असून शुक्रवार दि. 27 सकाळ ते रात्री दरम्यान पाऊस राहील. दि.28 ला कमी होईल. 
विदर्भात सह मराठवाड्यात २७ व २८ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ३० डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.


२७ डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम दक्षिण मराठवाडा व इतर जिल्ह्यांतील काही भागांमध्ये झाली अहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात हजेरी राहणार आहे,  छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती आहे. आज पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात आणि मराठवाड्यात कमाल तापमानात थोडी घट होईल.२९ डिसेंबरला मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता बहुतांश भागांत स्थिर हवामान असेल. डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार पीक पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे. वादळ आल्यास झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील कृषी विभागाने केले आहे.
 
         अकोलातील पाऊस येथे 👆 पहावा 


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या