Ticker

6/recent/ticker-posts

पती-पत्नीवर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी अटक, चान्नी ठाणे हद्दीतील विवरा येथील घटना

पती-पत्नीवर हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी अटकचान्नी ठाणे हद्दीतील विवरा येथील घटना



प्रतिनिधी नासीर शेख पातूर
पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत विवरा येथे पती-पत्नी दोघांवर सहा जणांनी लोखंडी रॉड व धारदार शास्त्राने सामूहीक हल्ला केल्याची घटना ३१ ऑक्टोंबर रोजीच्या संध्याकाळी घडली, होती. याप्रकरणी चान्नी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संजय कोहळे , सुधाकर करवते, सुनील भाकरे, अनिल सोळंके यांनी सापळा राचवून मुख्य आरोपी प्रफुल्ल मोहन कुरई याला ४ नोव्हेंबर रोजीच्या दुपारी विवरा परिसरातील अटक केली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पती पत्नीच्या जबाब वरून चान्नी पोलिसांनी सहा आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, दोघांची न्यायालयीन कोठडीत परवानगी झाली होती. पती पत्नी दोघांवर अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.पुढील तपास ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे. 


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या