Ticker

6/recent/ticker-posts

चान्नी पोलिसांचे परिसरात पथसंचलन

चान्नी पोलिसांचे परिसरात पथसंचलन 


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चान्नी पोलिसांनी रविवारी परिसरात पथसंंचलन केले, चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत प्रत्येक गावात विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी व गाव पातळीवर सुव्यस्था बाधित रहावी या हेतूने चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे,यांच्या मार्गदर्शनात चान्नी ठाण्याच्या हद्दीत परिसरात बसस्थान व विविध चौकामध्ये पथसंचलन केले, यावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे, उपनिरीक्षक संजय कोहळे, बीएसएफचे पोलीस निरीक्षक गौतम , व बीएसएफचे ४२ जवान , व चान्नी ठाण्याचे अनेक पोलीस कर्मचारी, दामिनी पथकाच्या महिला कर्मचारी, असा मोठा फौजफाटा पथसंचलन मध्ये सहभागी होता.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या