Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना उबाठा गटाचा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश

शिवसेना उबाठा गटाचा कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश


बोरगाव मंजू 
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, अनेक घडामोडी घडत आहेत, दरम्यान अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, गत पंचवार्षिक काळात आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी संधींचे सोने केले आहे, अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात लोककल्याणकारी योजना, मतदार संघाचा विकास, तसेच तरुण कार्यकर्ताची गाव तेथे फळी उभी केली आहे, आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी जातपात धर्म न पहाता सर्व सामान्य माणसाला न्याय हक्कासाठी सदैव शेतकरी शेतमजूर, लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, शिवाय मतदार संघाचा नव्हे तर अकोला जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते सह विकास साधला आहे, आमदार रणधीर भाऊ सावरकर गरीबांच्या झोपडीत शेतकऱ्यांच्या बांधावर, अन्याय ग्रस्त यांच्या मदतीला धावून जाणारे खरे लोकप्रिय लोकनेते म्हणून ओळखले जातात, दरम्यान युवकांना रोजगार, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ, उद्योग व्यवसाय आदी रोजगाराच्या संधी अकोल्यात खेचून आणले, त्यामुळे भाजपा पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत पुन्हा एकदा अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, दरम्यान भाजपा आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे, याच अनुषंगाने इतर राजकीय पक्षांतुन पदाधिकारी सह कार्यकर्ते रणधीर भाऊ सावरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला आहे, दरम्यान त्यामुळे रणधीर भाऊ सावरकर यांच्या विजय निश्चित झाला आहे, दरम्यान ऐन निवडणुकीच्या काळात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना शिवसेना उबाठा गटाचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला त्यामध्ये प्रकाश असलमोल, बजरंग अडचुले,मोहन काळे, कैलास दळवी,उमेश राजुरकर, संजय देशमुख, धनंजय मेहरे, नरेंद्र भवाने आदी पदाधिकारी सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश घेतला,

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या