कुंडी चोरणारी महिलांची माहिती देऊनही पोलीस कारवाई का करत नाहीत
पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन दोन दिवस होऊनही कारवाई नाही
अकोला - सोमवार दिनांक 7 ऑक्टोंबर च्या मध्यरात्री दोन वाजता च्या सुमारास महिला व दोन युवती हिंदी अनिल मालगे यांचे निवासस्थानी जाऊन एक कुंडी चोरली होती त्या संदर्भात अनिल मालगे यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली होती त्यावर आतापर्यंत काहीही कारवाई डाबकी रोड पोलीस स्टेशन द्वारे करण्यात आली नाही त्यानंतर मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी एक मुलांचा अनिल मालगे यांना मोबाईल आला कि आपल्या घरच्या कुंडी चोरणाऱ्या महिलांचा सीसीटीव्ही फुटेज मी पाहिला त्यामध्ये ह्या महिलांना मी ओळखत असल्याबाबत अनिल मालगे यांनी तत्काळ डाबकी रोडचे पोलीस निरीक्षक यांना मोबाईल द्वारे माहिती दिली त्यावर त्यांनी आपण डाबकी रोड पोलीस स्टेशनला या रीतसर लेखी द्या असे सांगितले त्यावर अनिल मालगे त्यांनी त्या मुलाला
बुधवार दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी रात्री.11. वाजताच्या सुमारास डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे आणले पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर येथील उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलाचे कागदावर लेखी बयांन नोदविले त्यानंतर आता पोलीस महिला नाहीत उद्या सकाळी आम्ही कारवाई करू गुरुवारला अशे आश्वासन दिले.
परंतु गुरुवार दिवसभर काहीही कारवाई केली नाही त्यानंतर गुरूवार दिनांक 16 ऑक्टोंबर च्या सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाला मी स्वतःडाबकी रोड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक माननीय धर्मा. सोनवणे यांना भेटलो त्यांनी त्यावर मेजर यांना सांगितले कारवाई करा मला मेजर यांनी अर्धा तास पोलीस स्टेशनला बसलो तरी काहीही कारवाई केली नाही त्यानंतर मला माजी आमदार प्रा.तुकाराम भाऊ बिडकर यांचा डब्बा देण्यासाठी आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे जायचे होते त्यामुळे मी त्यांना सांगून निघून गेलो जर पोलीस विभागाला चोरांची माहिती देऊन सुद्धा पोलीस कारवाई करत नसतील तर काय समजावे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे
चोरांची माहिती देऊन दोन दिवसाचा कालावधी झाल्यावर सुद्धा कार्यवाही होत नाही तर यामध्ये कुठे पाणी मुरत आहे हे वरिष्ठांनी शोधावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे लवकरच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांना याबाबत निवेदन देऊ असे अनिल मालगे ओबीसी महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग अकोला यांनी सांगितले
------------------------------------
0 टिप्पण्या