Ticker

6/recent/ticker-posts

अखेर गाव तलावातुन इसमाचा मृतदेह आपत्कालीन पथकाने शोधून काढला

अखेर गाव तलावातुन इसमाचा मृतदेह आपत्कालीन पथकाने शोधून काढला


पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीरच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर 20 फुट खोल पाण्यातील गाव तलावात तळाशी असलेला मृतदेह शोधून वर आणला

 मूर्तिजापूर 
 प्रतिनिधी- संतोष माने
वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे नजिकच्या तलावात नविन आरटीओ ऑफीस चे बांधकाम चालु असलेल्यां येथील कामावर असलेला श्रवन ईश्वर जांम्भोले अंदाजे वय (42) वर्ष रा.नवखला ता. नागभीड जि.चंद्रपूर हे बांधकाम चालु असलेल्या शेजारीच आज 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी शेजारील गाव तलावात बुडाल्यी माहीती मिळताच वाशिम तहसीलदार निलेश पळसकर सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले तेव्हा पथकाचे अतुल उमाळे,गोपाल गीरे,लखन खोडे,प्रदीप आडे यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर रवाना केले तहसीलदार निलेश पळसकर सर यांच्या आदेशानुसार एएसआय संजय गोडसे साहेब यांच्या नेतृत्वात ऑपरेशन चालु केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नांनंतर आज 22 ऑक्टोंबर रोजी दुपारी अंदाजे बारा ते 1 वाजताच्या सुमारास 20 फुट खोल पाण्यातील खाली तळाशी असलेला मृतदेह शोधून वर बाहेर आनुण पोलीसांच्या ताब्यात दीला यावेळी वाशिम तहसीलदार निलेश पळसकर सर,जि.आ.व्य. अ.शाहु भगत साहेब हे वरचेवर संपर्क साधुन होते. घटनास्थळावर पोलीस ठाणे वाशिम ग्रामीण चे एएसआय संजय गोडसे साहेब,पो.काॅ.शरद कुंभरे साहेब,तसेच वाशिम (आरटीओ)परीवहन विभागाचे आयएमव्ही अधिकारी एस.डी.पल्लेवाड सर,आणी घनवट सर तसेच इतर कामगार नागरिक नातेवाईक हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या