Ticker

6/recent/ticker-posts

अकोला पोलीसानी अवैध्य कत्तली करीता निर्दयतेने बांधुन ठेवलेले गोवंश जातीचे १५ जनावरे पकडले

अकोला पोलीसानी अवैध्य कत्तली करीता निर्दयतेने बांधुन ठेवलेले गोवंश जातीचे १५ जनावरे पकडले


अकोला
पोलीस स्टेशन रामदासपेठ हद्दीत दि. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ०३/०५ वा दरम्यान पोउपनी जोगदंड व पो स्टॉफ यांनी कोम्बीग गस्त पेंटोलीग करीत असताना गुप्त बातमीदाराचे खात्रीलायक बातमी वरून इक्बाल कॉलनी या परीसरामध्ये रेड केली असता १५ गोवंश जातीचे जनावरे निर्दयतेने अवैध्य कत्तली करीता बांधुन ठेवलेले मिळुन आले. वरून पो स्टे रामदासपेठ अकोला येथे अप क ३५३/२०२४ कलम ५ अ.५ ब.९ महा. पशु संरक्षण कायदा सह कलम ११ प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधि. प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून तपासात घेतला वरील गुन्हयातील १५ गोवंश जातीचे जनावर हे देखरेख व संगोपना करीता गोरक्षण संस्थान अकोला, येथे देण्यात आले.


तसेच आता पर्यंत दि. ०१/०१/२०२४ ते दि. ०२/१०/२०२४ रोजी पावेतो पो स्टे रामदासपेठ, अकोला यांनी गोवंश कार्यवाही मध्ये एकुण १८ गुन्हे गोवंश अधि. अन्वये दाखल करून १३० गोवंश जातीचे जनावरे व ०५ चारचाकी वाहने असा एकुण ४९,८८,५००/- रू किमंतीचा मुददेमाल जप्त केला असुन आतापर्यत एकुण १३० गोवंश जातीचे जनावरे याना जिवदान देवुन त्याना देखरेख व संगोपना करीता गोवंश गोरक्षण संस्थान अकोला, येथे देण्यात आले.


सदरची कामगीरी श्री बच्चन सिंह पोलीस अधिक्षक अकोला, श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधिक्षक, श्री सतिश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री मनोज बहुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रदिप जोगदंड, गायकवाड, मोरे पोहवा दादाराव टापरे, शेख हसन शेख अब्दुल, किशोर गवळी, संतोष गवई, गितेश कामळे पो कॉ श्याम मोहळे, रोशन पटले, अनिल धनभर, आकाश जामोदे, मनोज अरखराव, यानी केलेली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या