Ticker

6/recent/ticker-posts

तलावातील पुर्णपणे कुंजलेला मृतदेह मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढला

तलावातील पुर्णपणे कुंजलेला मृतदेह मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाहेर काढला 


अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक, शाखा मंगरूळपीरच्या जवानांची साहसी कामगीरी वनोजा गावातील तलावातुन पुर्णपणे कुंजलेला मृतदेह आज सकाळी बाहेर काढला


मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे पो.नी.सुधाकर आडे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा गावातील तलावात एका ईसमाचा मृतदेह तरंगत असताना दिसून येत असल्याची माहीती आज सकाळी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ पाचारण केले क्षणाचाही विलंब न करता मंगरूळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे,गोपाल गीरे,शेखर केवट,लखन खोडे,विष्णु केवट,अश्विन केवट,प्रदीप आडे यांना शोध व बचाव साहित्यासह आज घटनास्थळी पाठवीले आणी तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले असता आज 14 ऑक्टोंबर रोजी सकाळी अथक प्रयत्नांनंतर तलावातील मृतदेह बाहेर काढून पोलीसांच्या ताब्यात दीला.अतिशय दुर्गंधी आणी पुर्णच कुंजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेह काढतांना जवानांची खुप दमछाक झाली. मृतक हे विजय दौलतराव राऊत अं.वय (50) वर्ष रा.वनोजा ता. मंगरुळपीर जि.वाशिम येथील असल्याचे निष्पन्न झाले ..यावेळी मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे पो.नि.सुधाकर आडे सर,पिएसआय. वाघमोडे सर,पो.काॅ.संजय घाटोळे साहेब,पो.काॅ.जितु ठाकरे साहेब,पो.काॅ.नागेश राठोड साहेब,पो.काॅ.चरण चव्हाण साहेब,आणी नातेवाईक हजर होते. आ.व्य.अ.शाहु भगत हे संपर्क साधुन होते.अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या