Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी कार्यालयात माहिती कार्यपुस्तिकेचा होणार प्रकाशन कार्यक्रम

भारतीय जनता पार्टी कार्यालयात माहिती कार्यपुस्तिकेचा होणार प्रकाशन कार्यक्रम


अकोला ,
मतदारांना दिलेला विश्वास मतदारांनी टाकलेली जबाबदारी कर्तव्य तसेच मतदारांनी दिलेले  अभिवचन याची केलेली पूर्ततेचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची परंपरा जनसंघाचे खासदार स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी यांनी केली होती हीच परंपरा अकोला  पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी कायम ठेवून 2014 मध्ये निवडून आल्यानंतर 2019 ला आपला कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला होता आता  2024 पर्यंतचा लेखाजोखा सर्व स्पर्शी विकास  जनतेसमोर मांडण्यासाठी भारतीय जनता पार्टी कार्यालयात माहिती कार्यपुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालयात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित असल्याची माहिती भाजपा सूत्राने दिली. मतदारांनी टाकलेली जबाबदारी कर्तव्य व आपल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडण्याचा व सातत्याने 18 तास जनसंपर्काच्या माध्यमातून सर्व स्पर्शी विकास पाटबंधारे बंधारे , दळणवळण सोयी,  शेतकऱ्यांसाठी केलेले काम तसेच विकास कामासाठी विकास कामांना आयाम देऊन सांस्कृतिक भवन, आरोग्य सेवा तसेच वेगवेगळ्या तीर्थस्थळाचा विकास व व्यक्तिगत समस्या निराकरण साठी कठीबद्ध असणारे व लोकांच्या जन समस्या निर्माण करण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागाचा समतोल विकास सातत्याने  लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने माजी मंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात आपले सहकारी खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या माध्यमातून सहकार्याने आपल्या मतदार संघाचा विकास साधण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारे आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा पुस्तकाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत  पोहोचवण्याचा मनोदय केला आहे   या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कार्यालयात खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल बळीराम शिरस्कार तेजराव थोरात देवेंद्र देवर कृष्णा शर्मा राजेश  रावण कर, माधव मानकर सजयगोटफोडे, एडवोकेट देवाशिष काकड, निलेश निनोरे संदीप गावंडे रमेश करिहार आम्रपाली उपरवट , दिलीप मिश्रा चंदा शर्मा आधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे


आमदार रणधीर सावरकर व इतर मान्यवर मुंबई आणि दिल्ली येथे या बैठकीत सहभाग

विधानसभा निवडणुक उमेदवार व निवडणुकीच्या प्रचाराचा व वेगवेगळ्या विषयाचा आराखडा तयार करतात बैठकीत भाजपा महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव , केंद्रीय मंत्री नामदार अश्विन वैष्णव केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व या बैठकीत भाजपा प्रदेश सरचिटणीस शेतकऱ्यांची विदर्भाचे नेते आमदार रणधीर सावरकर व इतर मान्यवर मुंबई आणि दिल्ली येथे या बैठकीत सहभाग

अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब,
 भाजपच्या विशेष बैठकांमध्ये आमदार रणधीर सावरकर यांना महत्वाचे स्थान

विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया असो किंवा निवडणुकीचा प्रचार व इतर महत्वाच्या विषयाचा आराखडा तयार करण्या संबंधित मुंबई व दिल्ली येथे बैठकांच सत्र सुरु आहे. 

या बैठकीत भाजपाचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव , केंद्रीय मंत्री नामदार अश्विन वैष्णव, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच 

पक्षाच्या या महत्वाच्या बैठकीत भाजपचे प्रदेश सरचिटणीस विदर्भाचे नेते आमदार रणधीर सावरकर यांना सुद्धा महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.हि बाब अकोला जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या