सुमिरमा फाउंडेशन द्वारा मोफत कावडधारी भक्तांसाठी विविध उपचारासह औषधी वितरण
अकोला
जय भोले !जय भोले! जय भोले!
दरवर्षी श्रावण महिन्यात कावड यात्रा पायीवारी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यादरम्यान आपल्या शिवभक्तांना आरोग्य विषयी त्रास होत असल्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांना वेळेवर औषधोपचार मिळावा यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा रमाकांतजी खेतान यांच्या मार्गदर्शनाखाली सुमिरमा फाउंडेशन द्वारा मोफत विविध प्रकारच्या उपचारासह औषधी वितरणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. याचसोबत शिवभक्तांना इजावगैरे झालेल्यांना ड्रेसिंग सुद्धा करून देण्यात आली. या सेवेचा हजारो शिवभक्तांनी लाभ घेतला. या करिता सुमिरमा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा डॉ. पुजा खेतान यांच्यासमवेत मीना लांडे, अश्विनी परदेशी, अश्विनी काळे, स्वाती बचे, सोनिया शेगावकर, श्रुती सदांशिव, शीतल राऊत, आशिष खिल्लारे, विशाल धांडे, आकाश सोनोने, प्रविण काळे,विनोद इंगळे, प्रवीण भोरे, पार्थ गोरे, संजय ठोके, देवेंद्र तिवारी, विक्की मोरे, लोकेश शर्मा, आनंद गवई, प्रशांत जाधव, प्रमोद जाधव, सागर शिंदे, आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या