अकोला पूर्व मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न
जनतेच्या विश्वासाच्या भरशावरच विकासाला चालना मिळाली: आमदार रणधीर सावरकर
अकोला पूर्व मतदार संघातील मतदारांनी विकासाचा दृष्टीकोन असलेल्या भारतीय जनता पार्टी व पक्षाच्या नेतृत्वावर सातत्याने आपला " दृढ विश्वास " दाखवला आहे. आनी त्यांचा हाच " विश्वास " आजपर्यंत विकासाला नवी चालना देणारा ठरत आला आहे. मतदारांना दिलेली विकासाची आश्वासने पुर्ण करून त्यांच्या समस्या सोडविताना मनाला एक वेगळं समाधान मिळत आहे. असे भावनिक मत आमदार रणधीर सावरकर यांनी पारळा , देवर्डा, टाकळी खुर्द येथिल विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलतांना व्यक्त केले. मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी अकोला पूर्व मतदार संघातील पारळा, देवरडा, टाकळी खुर्द येथे कोट्यावधी रुपयांच्या रस्ते बांधकाम , सामाजिक सभागृह सह विविध कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठया उत्साहात पार पडला.
आमदार रणधीर सावरकर यांच्या शुभहस्ते पार पडलेल्या कार्यक्रमाला त्यांच्या सोबत राजेश नागमते,मधुकर पाटकर, पंचायत समितीचे उपसभापती संतोष शिवरकार, जिल्हा उपाध्यक्ष दादाराव पेटे, धारेलचे सरपंच विनोद मंगळे, संजय गांधी निराधार समितीचे अकोट तालुका अध्यक्ष दत्तू पाटील गावंडे, गजानन नळे, विठ्ठल वाकोडे, मंगेश ताडे, विवेक भरणे, अक्षय जोशी, शुभम लोने, मंगेश घुले, सुभास मुकुंदे, कीशोर बुले, किशोर सरोदे, पवन वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार सावरकर यांचा ठिकठीकाणी शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आजपर्यंत कधीच निधी कमी पडू दिला नाही. आणि भविष्यातही कधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिली. यावेळी पक्षाच्या अकोला जिल्हा ग्रामीण सोशल मीडिया सहसंयोजक पदी चोहोटाबाजार पवन वर्मा यांची निवड करण्यात आली. आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
याप्रसंगी पारळा येथिल निखिल कडू, सुमेध बागलकर, सुरेश जायले, संजय बागलकर, शिवनाथ साळुंके, गणेश बागलकर, अशोक कडू, नाजूकराव घाटोळ, तुकाराम गायकवाड, गोपाल कडू, गणेश डांगरे, जयदेव ठाकरे, विठ्ठलराव घुले, मुरलीधर महल्ले, रवींद्र वाडेकर, माणिक पारस्कर, गोपाल महाराज, विनोद ठाकरे, देवरडा येथिल शांताराम अरबट, नंदूभाऊ अरबट, भानुदास घाटोड, रामचंद्र खंडारे, गजाणन मालठाणे, प्रवीण अरबट, गोपाल साबळे, नारायण साबळे, श्रीहरी मोरे, दिनकर पाटकर, गजानन गावंडे, संजय अरबट, रामदास घाटोड, गजानन थडांगे, श्रीराम अरबट, विजय अरबट, वासुदेवराव शेळके, केशवराव साबळे, प्रमोद खंडारे, अभय अरबट, श्रीराम शेगोकार, राजू डांगे, संदीप अरबट तसेच टाकळी खुर्द येथिल निलेश खोटरे, विष्णू आढे, निलेश वहिले, सुधाकर खोटरे, प्रज्ञा दामोधर, प्रकाश पाटकर, मंगेश ताडे, किसनराव भगत, सुनील वहिले, हरिनारायण वावरे, संतोष गोळे, दीपक पाटकर, विलास गोळे, विलास बुंदे, पूर्णाजी गवळी, राजू ताडे, गजानन वाडी, सुनील दामोधर, बबलू पाटकर, शेवकराम खेडकर, निळू वहिले, धनराज आढे, भरत साळुंके दादाभाऊ गोळे, गजानन भटकर, हरिभाऊ इंगळे, गणेश म्हतूरकर, प्रभू गोळे सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या