Ticker

6/recent/ticker-posts

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन 'वंदे मातरमच्या' जयघोषात मनुताई कन्या शाळेत जल्लोषात साजरा

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन 'वंदे मातरमच्या' जयघोषात मनुताई कन्या शाळेत जल्लोषात साजरा


अकोला
आज सलाम आहे त्या वीरांना, ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली, जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे, भारत देश स्वातंत्र्य राहिला".
दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज, देशाची भावी पिढी, संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा, सन्माननीय पदाधिकारी, शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, सन्माननीय पर्यवेक्षिका सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती, राष्ट्रगीताचे आसमंतात निनादणारे सूर, अशा उत्साह पूर्ण व मंगलमय वातावरणात 15 ऑगस्ट 2024 रोजी स्थानिक मनु ताई कन्या शाळेच्या प्रांगणात स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा तसेच मुख्याध्यापिका, संस्थेचे सल्लागार शाळा समितीच्या अध्यक्षा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.


 त्यानंतर संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा यांनी भारताला विश्वगुरूपदी विराजमान झालेले बघायचे असेल तर माणसातला माणूस शोधा, चांगले संस्कार अंगी कारा, तरच आपल्या तिरंग्याचा सन्मान होईल. अशा पद्धतीने मुलींना मोलाचा संदेश दिला .त्यानंतर विद्यार्थिनींनी समूह गीत सादर केले. समूहगीताला शाळेतील शिक्षिका सौ. किरडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवण क्लासच्या ज्या विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवले त्यांचे व शिवण क्लासच्या शिक्षिका कु. रंजू ताई यांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. दहावीतील दरवर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील माजी मुख्याध्यापिका, माजी उपमुख्याध्यापिका, माजी शिक्षिका यांनी गोळा केलेल्या फंडाच्या रकमेतून बक्षीस वितरित करण्यात येते. मान्यवरांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. व शाळेतर्फे आणि संस्थेतर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यानंतर विश्व मांगल्य ग्रुप तर्फे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली .कार्यक्रमाला शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ. धारस्कर मॅडम, संस्थेचे सल्लागार श्री चौधरी सर, शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. गदाधर मॅडम शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मांगे मॅडम यांनी केले. त्यानंतर सो पल्लवी ताई कुलकर्णी मॅडम, श्री अनिरुद्ध चौधरी सर सौ .दीप्तीताई गदाधर , सौ ऐश्वर्या ताई धारस्कर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न झाला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या