Ticker

6/recent/ticker-posts

रक्षाबंधन दिवशी पाठवून मातृशक्तीशक्तीचा सन्मान गौरव, मातृशक्ती तर्फे 51 हजार राख्या

रक्षाबंधन दिवशी तीन हजाराची भेट पाठवून मातृशक्तीशक्तीचा सन्मान गौरव, मातृशक्ती तर्फे 51 हजार राख्या


अकोला 
लाडक्या बहिणीचा भाऊ देवा भाऊ यांना अकोला जिल्हा महिला आघाडी भाजपा तर्फे व मातृशक्ती तर्फे 51 हजार राख्या सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सुभद्राताई नाईक यांच्याकडे स्वाधीन केले. हिंदू सणामध्ये रक्षाबंधन याचा महत्त्व लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी स यांनी महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत देऊन केला मुलींना मोफत शिक्षण सोबत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये रक्षाबंधन दिवशी पाठवून मातृशक्तीशक्तीचा सन्मान गौरव केला. परंतु महाविकास आघाडी न्यायालयात जाऊन या योजना बंद करण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केला. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मान देऊन मातृशक्तीचा गौरव केला भ्रष्टाचाराने मोठे झालेले महाविकास आघाडीचे नेते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सुळे, काँग्रेस या योजनेला विरोध करत आहे महायुतीने भेदभाव न करता मताचा राजकारण न करता समाज निर्माण करण्याचं कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. 


यावेळी भाजपा महिला आघाडी व बंजारा समाज आदिवासी तसेच समाजातील विविध घटकातील मातृशक्तीने आमदार सावरकर, यांना राखी बांधून २००१,, भगिनींनी राख्या बांधल्या, स्थानिक नामदेवराव पोहरे सभागृह मराठा मंगल कार्यालय कार्यक्रमा ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशोर पाटील हे होते तर मंचावर सौभाग्यवती सुहासिनी ताई , धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल सुभद्रा ताई नाईक, बळीराम सिरस्कार, जयंत मसने वैशाली निकम चंदाताई शर्मा, माधव मानकर मंजुषाताई सावरकर समीक्षा ताई धोत्रे, अर्चनाताई मसने विजय अग्रवाल,, वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, रश्मी ताई कायंदे अर्चनाताई शर्मा चंदाताई ठाकूर,सजयगोटफोडे एडवोकेट देवाशिष काकड, सीमाताई मानटे, सुनिता ताई अग्रवाल मंचावर विराजमान होते. 


यावेळी अकोला जिल्ह्यातून अकोला पूर्व मधून गजानन नगर येथील मातृशक्ती सौभाग्यवती शोभाताई मानकर तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील रिधोरा येथील सौभाग्यवती रश्मीताई रेठे यांनी संवाद साधला देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून त्यांनी पुन्हा महायुतीचा सरकार विश्वास व्यक्त करून आपण मुख्यमंत्री म्हणून हवं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू असे सांगितले. 
 पातुर तालुक्यातील सावरगाव येथील बंजारा समाजातील मातृ शक्ती ने आपल्या वेशभूषा मध्ये येऊन गीत प्रस्तुत करून उपस्थित त्याचे मन जिंकली यावेळी अनेक महिलांनी भजन कीर्तन सोबत गीत प्रस्तुती करून सातत्याने तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मातृशक्ती उपस्थित होते. यावेळी मान्यवरांची ओवाळणी करून रक्षाबंधन उत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे संचालन रश्मीताई कायंदे यांनी केले. यावेळी देवेंद्रजींनी आपलं काम खटाखट नाही नाही तर फटाफट असून त्वरित न्याय देण्याचा असून मातृशक्तींचा आशीर्वाद हेच महायुतीचे बळ असल्याचे सांगून पण नकली भावापासून सावध राहण्याचे काम करावे. वेगवेगळे अफवा पसरून महायुती महाराष्ट्रात अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असतील तरी जनता जनार्दन यांचा आशीर्वाद प्रेम कायम असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या