अंशतः अनुदानित शाळांवरील टप्पा वाढ अनुदान मागणीसाठी धरणे आंदोलन
अकोला : शिक्षणमंत्र्यांनी अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, अंशतः अनुदानित शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेवरील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ अनुदान त्वरित द्यावे, यासह विविध मागण्या करीत शिक्षक समन्वयक संघाकडून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २२ जुलै पासुन धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
३० जुलै पूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तत्काळ निधी वितरणाचा आदेश देऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांकडून विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी धरणे आंदोलनात शिक्षक समन्वयक संघाचे प्रा. सदानंद बानेटकर, प्रा. गणेश ढोरे, प्रा. संतोष वाघ, प्रा. श्रीकांत पळसकार, प्रा. मो. फारुख, प्रा. दीपक बिरकड आदींचा सहभाग होता.
0 टिप्पण्या