30 अकोला पश्चिम मतदार संघातील अवैधरित्या अफगाण, बांगलादेशी नागरिकांचे मतदान कार्ड व राशन कार्ड नोंदणी धारकावर कारवाहीची मागणी
अकोला
खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, विजयभाऊ अग्रवाल, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना 30 अकोला पश्चिम मतदार संघातील अवैध रित्या अफगाण, बांगलादेशी नागरिकांचे मतदान कार्ड व राशन कार्ड ची नोंदणी धारकावर कारवाही करणे बाबत निवेदन देण्यात आले.
अकोला महानगरात अकोला पश्चिम मतदार संघातील अकोट फैल, सोळाशे प्लॉट, नायगांव, इराणी वसाहत, सिलोडा तसेच वाशीम बायपास, खदान परिसर या भागात बाळापुर व बार्शीटाकळी भागातील मतदार यांनी बोगस मतदान करण्याकरिता आपल्या नांवाची नोंदणी करून घेतली आहे तसेच या भागात बांगलादेशी तसेच अफगाणी नागरिकांचे मतदान कार्ड व राशन कार्ड हे अवैध रित्या तयार करण्यात आले आहेत. या संबधीची तक्रार रामदास पेठ पोलीस स्टेशन येथे नोंदण्यात आली आहे.
वरील भागातील नवीन मतदार नोंदणी झालेले अर्ज व मंजूर झालेले राशन कार्ड यांचे पुन्हा निरीक्षण करून अवैध मतदार कार्ड व राशन कार्ड हे त्वरीत रद्द करण्यात यावे व संबधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. संजय गोटफोडे, अॅड देवाशिष काकड, संतोष पांडे, दिलीप मिश्रा, पवन महल्ले, मनोज साहू, नितीन राउत, बल्लू चौधरी, प्रकाश घोगलीया, कपिल बुंदेले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या