पोलीस शिपाई भरती प्रक्रियेचा शेवटचा दिवस, ११५४ महिला उमेदवारापैकी ७२९ उमेदवार हजर
अकोला जिल्हा पोलीस दलात एकुण १९५ 'पोलीस शिपाई 'पदाकरीता भरती प्रक्रिया सुरु असुन आज दिनांक ११ जुलै २०२४ रोजी पोलीस भरती करीता सकाळी ५.०० वाजता उमेदवारांना पोलीस मुख्यालय अकोला येथे शारीरीक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यामध्ये आज रोजी बोलाविण्यात आलेल्या ११५४ महिला उमेदवारापैकी ७२९ उमेदवार हजर झाले. हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्र पडताळणी करण्यात येवून त्यानंतर उंची चे मोजमाप करण्यात आले. त्या मध्ये कागदपत्र पडताळणी व उंची मध्ये एकुण १०० उमेदवार अपात्र झाले आहेत. तसेच आज रोजी बोलाविण्यात आलेल्या १००० पुरुष उमेदवारांपैकी ७११ उमेदवार हजर झाले. हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्र पडताळणी करण्यात येवून त्यानंतर छाती व उंची चे मोजमाप करण्यात आले. त्या मध्ये कागदपत्र पडताळणी, छाती व उंची मध्ये एकुण ७० उमेदवार अपात्र झाले आहेत. पात्र उमेदवार यांची सर्वप्रथम १०० मीटर धावण्याची चाचणी व गोळा फेक चाचणी ही पोलीस मुख्यालय अकोला येथील कवायत मैदानावर घेण्यात आली व त्यानंतर ८००/१६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली.
दिनांक १९.६.२०२४ रोजी पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाल्यापासुन ते आजपावेतो एकुण २१७१२ उमेदवारांना आवेदन पत्रे ऑनलाईन पाठविण्यात आली होती त्यामध्ये १६०५८ पुरूष, ५६५३ महीला व १ तृतीयपंथी उमेदवार यांचा समावेश होता. त्यापैकी १०६६५ पुरुष ४२५९ महीला व १ तृतीयपंथी उमेदवार असे एकुण १४९२४ उमेदवार पोलीस भरतीकरीता उपस्थित राहीले त्यापैकी १३२९२ उमेदवार पात्र व १६३२ उमेदवार अपात्र झाले.
पोलीस भरती सन २०२२-२३ करीता बाहेरगावावरून आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणुन रात्रीला राहण्याची व्यवस्था राणी महल, पोलीस लॉन व पोलीस बॅरेक, पोलीस मुख्यालय अकोला येथे निःशुल्क स्वरूपात करण्यात आली होती. तसेच मैदानावर चाचणी दरम्यान पाणी, शौचालय, रूग्णवाहिका, इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. उपरोक्त शारीरीक चाचणी मध्ये १:१० या प्रमाणानुसार लेखी परीक्षेकरीता पात्र असलेल्या उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणवत्ता यादी लवकर प्रसारीत करण्यात येईल व लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल.
0 टिप्पण्या