Ticker

6/recent/ticker-posts

गाव तलाव असलेल्या तलावातून अवैध रित्या गौण खनिज उत्खनन? यासाठी कोणाचा अभय?

गाव तलाव असलेल्या तलावातून अवैध रित्या गौण खनिज उत्खनन? यासाठी कोणाचा अभय?


प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे.
 अकोला, पातूर तहसिल अंतर्गत येत असलेले ग्राम विवरा येथे ई क्लास जमिनीमधील गाव तलाव असलेल्या तलावातून अवैध रित्या गौण खनिज मुरूम बिना रॉयल्टी चां रात्रीला राज रोज जेसीबी लावून चोरीला जात आहे. शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडाला आहे.  गावातील कर्मचारी तलाटी याची पूर्ण जबाबदारी असुन दुर्लक्षित होत आहे.  पत्रकार लोकांनी डायरेक्ट मुरूम भरताना जेसीबी, दोन टीप्पर यांचा फोटो व व्हिडिओ तहसीलदार यांना पाठवले असता गावातील तलाठी तहसिल कार्यालयत खोटा अहवाल सादर करून हा मुरूम सुकळी शिवारात असल्याचे म्हणत उडवा उडी ची उत्तरे देत आहेत. सदर फोटो व्हिडिओमध्ये संपूर्ण स्थळ झाडे झुडपे विवरा गावाच्या तलाव काठावरती आहे.
        
         सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे


 नागरिकांच्या तक्रार नुसार  11 जुलै 2024 रोजी तलावाची मोका पाहणी केली त्या मध्ये पातूर नायब तहसीलदार  बळीराम चवान तसेच सोबत मंडळ अधिकारी सस्ती येथील बडोले साहेब, यांनी मोका पाहणी केली असता, त्यांच्या अंदाजे 600 ब्रास अवैध मुरूम चोरी गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यावेळी त्यांच्यासह गावातील तलाटी शंकर लोखंडे, माजी पोलिस पाटील भुजंगराव देशमुख आणि तक्रारकर्ता असे होते. तक्रार कर्त्यानी तलाठी यांची तक्रारीत निलंबित करण्याची मागणी केली आहे.  तलाठी यांच्या सल्ल्यानुसारच अवैध गौण खनिज मुरूम गेलेला आहे, अशी तक्रार उपविभागीय महसूल अधिकारी बाळापूर आणि तहसिल कार्यालय पातूर येथे फोटो विडीओ सह सादर केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पातूर तहसिलदार डॉ. राहुल वानखेडे करीत आहेत. 


                         तक्रार 👆



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या