Ticker

6/recent/ticker-posts

मायक्रो ओबीसीला आत्मविश्वास देणे आवश्यक- प्रकाश अण्णा शेंडगे

मायक्रो ओबीसीला आत्मविश्वास देणे आवश्यक- प्रकाश अण्णा शेंडगे 


अकोला. जात निहाय जनगणना करणे गरजेचे आहे.
 बिहार राज्यात ओबीसी जन गणना झाली असल्यामुळे तेथे ओबीसी ची वास्तव स्थिती कळून चुकली आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात आम्ही जात निहाय जनगणना करणे गरजेचे आहे कारण संविधानांत ओबीसी ला २७ टक्के आरक्षण दिलें गेलें आहे. मात्र या २७ टक्के मध्ये जरांगे यांच्या मार्फत मराठा समाज घुसू पाहत आहे राज्य सरकार त्यांचे लाड पूरवित आहे. सरकारने मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण दिल्यास ओबीसी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. ओबीसी आरक्षण वाचवीण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरु आहे तर राजकीय मार्गाने आरक्षण रक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टी स्थापन झाली असून ही पार्टी महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक मध्ये संपूर्ण २८८ जागा लढविणार असून त्याची संपूर्ण तयारी पार्टीने केली असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टी अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आज अकोल्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रकाश अण्णा शेंडगे हे अकोल्यात ओबीसी बहुजन पार्टी ची अमरावती विभागीय बैठकी साठी आले होते. त्यांनी याबाबत आढावा घेतला असून आज एकूण ७ ठरावं पारित केले आहेत.

       सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे..

नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या आहेत. पुढील तीन महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहे राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका संभवत आहे ओबीसी च्या अस्मितेचा अस्तित्वाचा व आरक्षणाचा प्रश्र निर्माण झाला आहे. या पार्शभूमीवर ओबीसी जनमोर्चा या सामाजिक संघटनेतून ओबीसी बहुजन पार्टींचा उदय झाला आहे. ही पार्टी विदर्भामध्ये असलेल्या सर्व ६२ विधानसभा मतदार संघमध्ये आपले उमेदवार उतरवीत आहे.असेही त्यांनी सांगितले. यावेळी ओबीसी बहुजन पार्टी उपाध्यक्ष प्रा. टी.पी मुंडे, राष्ट्रीय महासचीव चंद्रकांत बावकर , कोषाध्यक्ष जी.डी तांडेल, व्हि.डी काळे, अनिल शिंदे,राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे (गोबरे), माजी आमदार तुकाराम बिरकड, डॉ अशोक ओळंबे, माजी आमदार नारायण गव्हाणकर, जयंत म्हसने,अमरावती विभागीय अध्यक्ष सुभाष सातवं, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर,ओबीसी जनमोर्चा अकोला जिल्हाध्यक्ष आकाश कवडे , महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई सरोदे ,मायाताई इरतकर वं ओबीसी बहुजन पार्टी जिल्हाध्यक्ष ऍड. दाते, अकोला महिला जिल्हाध्यक्ष मीनाताई कवडे,इतर पदाधिकारी उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या