"रक्तदान म्हणजे जीवनदान" रक्तदान हे माझे कर्तव्य
रक्तदान हे माझे कर्तव्य हीच भावना आपल्या जीवनाचा आदर्श मानून आज दिनांक ०७.०७.२०२४ रोजी सुमिरामा फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात समाकांतजी खेतान यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरातून भरभरून सहकार्य व 50 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये अनेक महिला, प्रथमता रक्तदान करणाऱ्यांनी सहभाग घेतला.
या महान कार्यात समाजातील मा. गोपीकिसनजी बाजोरिया, विवेकजी पारस्कर, डॉ. अशोक ओलंबे पाटील, निखिलेश दिवेकर, शाहिद इक्बाल, मनोज पाटील, रवी धनुका, सुभाष चांडक, देवेंद्र अग्रवाल, विशाल कोरडे, अश्विन बाजोरिया, तसेच खेतान परिवारातील गोविंद खेतान, गोपाल खेतान, हेमंत खेतान, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते डॉ. पुजा रमाकांत खेतान, विशाल धांडे, आशिष खिल्लारे, लवकेश शर्मा, प्रवीण भोरे, प्रवीण काळे, आनंद गवई, आकाश सोनोने, विकी मोरे, सोनू ठाकूर, पार्थ गोरे, विनोद इंगळे, सय्यद जहीर, नंदकिशोर गावंडे, देवेंद्र तिवारी, संजय ठोके, सागर शिंदे, कीर्ती काळे, श्रिया शर्मा, मीना लांडे, गीता मौर्य, अश्विनी काळे, शीतल राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. आमची संस्था अश्या प्रकारे नेहमीं अनेक मानवसेवेचे उपक्रम सतत आणि अथकपणे राबवते. त्यामुळे आपण सर्वांनी सुध्दा आमच्या सोबत सहभागी होऊन समाजसेवेच्या कार्यात सहभागी व्हावे.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या