लोहारा येथी जि.प.प्राथमिक केंद्रीय शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सामाजिक कार्यक्रम संपन्न
प्रतीनीधी- श्रीकृष्ण पवार
बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील जि.प.प्राथमिक केंद्रीय शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. तसेच लोहारा येथील शेया जावजी या मुलीने आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरांमध्ये हुबेहुब दिसणारे विठोबा , संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांची मुर्ती रांगोळी ने काढली होती हे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, ही पंचांगातील एक तिथी आहे.हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आज लोहारा जि.प.प्राथमिक केंद्रीय शाळेत आषाढी एकादशीनिमित्त सामाजिक कार्यक्रम घेतांना उपस्थित म्हणून मुख्याध्यापक प्रविण वऱ्हाडे, शिक्षक गजानन सोनोने रामराव मुढे, बुरुकुले,मीनाक्षी आढे मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थी गावातील नागरिक उपस्थित होते. .
0 टिप्पण्या