Ticker

6/recent/ticker-posts

माना पोलिसांनी गोवंश तस्काराच्या आवळल्या मुसक्या.! कत्तलीसाठी घेऊन जात असलेले दोन गोवंशांना माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान

माना पोलिसांनी गोवंश तस्काराच्या आवळल्या मुसक्या.! कत्तलीसाठी घेऊन जात असलेले दोन गोवंशांना माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान                                 


माना परिसरात गोवंश मास विक्री जोमात सुरू असल्याची जनसामान्यातून चर्चा

 प्रतिनिधी- संतोष माने 
मुर्तीजापुर:जिल्ह्यातच नव्हे तर मुर्तीजापुर तालुक्यात गोवंश तस्करी व मास विक्रीचा व्यवसाय मोठ्या जोमाने सुरू आहे.हे तर मागील काही दिवसात झालेल्या कारवायांवरून दिसून आलेच आहे.विशेषतः माना परिसरात अनेक वर्षापासून सुरू असलेला गोवंश मास विक्रीचा धंदा जोरात सुरू असून शासनाने यावर बंदी असताना सुद्धा गोवंश तस्कर मात्र राजरोसपणे मास विक्रीचा धंदा सुरू आहे.अशातच आज बुधवार 17 जुलै रोजी एकादशीच्या दिवशी मुर्तीजापुर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात दोन गोवंश बैल कत्तलीसाठी नेत असताना आरोपीसह ताब्यात घेतल्याची कारवाई माना पोलिसांकडून करण्यात आली. माना पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज एकादशीच्या दिवशी दोन बैलांना जीवदान मिळाले.
प्राप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गोवंश जनावर यांना निर्दयपणे पीडा व यातना होईल अशा प्रकारे काठीने मारून कत्तलीसाठी हाकलत नेत असलेले व बळजबरीने जनावरांना मारून ओढताना दोन गोवंश हे माना पोलिसांनी पकडले असून यातील आरोपी मोहम्मद शारीक शेख अकबर कुरेशी वय 40 वर्ष रा. माना याला माना पोलिसांनी अटक केली.असल्याचे समजते.


शासनाने गोवंश तस्करीवर बंदी आणली असून अद्यापही गोवंश तस्कर हे राजरोसपणे तालुक्यासह माना परिसरात मास विक्रीचे व्यवसाय करीत असल्याचे गावात चर्चा आहे. दररोज गोवंशाची तस्करी करून त्यांचा मास विक्रीचा धंदा परिसरात जोरात सुरूच आहे. या संबंधित प्रशासन मात्र कुंभकरण झोपेत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यात व माना गावातच नव्हे तर माना परिसरात सुद्धा गोवंश मास विक्रेत्यांची धंद्याला उचल असून चूप का? असा संभ्रम नागरिकांमध्ये पसरला आहे. तरी या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीची दखल घेऊन निष्पाप मरणाऱ्या मुक्या जनावरांचा दुवा घ्यावा. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी माना पोलिसांनी अपराध नंबर 220/24 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार, ५,५ (ब) ९ नुसार गुन्हा दाखल केला आहे.सदर कारवाई ठाणेदार सुरज संभाजी सुरोशे यांचे मार्गदर्शनाखाली जयकुमार मंडावरे, पंकज वाघमारे, उमेश हरमकर, यांनी केली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या