Ticker

6/recent/ticker-posts

अकोला शहरासाठी वाण प्रकल्पतील आरक्षित पाण्यावरील स्थगनादेश हटवा, राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत मागणी

अकोला शहरासाठी वाण प्रकल्पतील आरक्षित पाण्यावरील स्थगनादेश हटवा, राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत मागणी

अकोला. शहरातील नागरिकांना लागणारे पाणी महान धरणातील कमी पडत असल्याने शेजारील बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पतील पाणी आरक्षित करण्यात आले. मात्र आपल्याच जिल्ह्यातील वाण प्रकल्प मधील वाण नदीतील पाणी हे पहाडातून येत आहे. त्यामध्ये कोणत्याही एम आय डी सी किंवा नाल्या, नद्यामधून येत नाही त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य आणि शुद्ध आहे तरीही भविष्यात लागणारे पाणी नियोजन करण्यासाठी जिगावं प्रकल्प मधून पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे शहरातील जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून वाण धरणातील पाणीसाठा उपलब्ध असून त्यावर आताचे सत्ताधारी पक्षाचे आणि २०१९ मध्येही सत्ताधारी मुख्यमंत्री, आमदार,खासदार आणि पालकमंत्री यांनी वाण प्रकल्प मधून पाणी साठी स्थगनादेश दिला होता तो आतातरी हटवीन्यात यावा . अशी मागणी शिवसेना उबाठाचे शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.



महानगर पालिकेच्या सभेत २०१९ मध्ये ऑगस्ट महिण्यात वाण धरनातून पाणी आरक्षित केले होते. मात्र ३१ सप्टेंबर २०१९ ला स्थगित करण्यासाठी आमदार भरासाकले यांनी स्थगितीची मागणी केली होती. ती मागणी मान्य करून तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्थगनादेश दिला होता. वाण नदी आपल्याच जिल्ह्यात असून वाण नदीत वाहणारे पाणी हे पूर्णतः केवळ पहाडा मधून वाहून येते. यामध्ये कोणतेही दूषित पाणी मिसळत नाही. त्यामुळे वाण मधील पाणी १०० टक्के शुद्ध पाणी आहे. असे पाणी उपलब्ध असूनही अमरावती जिल्ह्यातुन वाहून येणारी पूर्णा नदी मध्ये एम आय डी सी मधील दूषित घाण पाणी, नदी नाल्यामधील सांडपाणी वाहून येते तेच पाणी शेजारील बुलढाणा जिल्ह्यातील जिगावं प्रकल्प मधून आरक्षित केल्याचा दिंडोरा पिटल्या जातो. मात्र वास्तववात शुद्ध पाणी असूनही आणि सत्ताधारी आपणच असतानाही केवळ दिलेला स्थगनादेश हटवीन्याची गरज आहे. तो स्थगना देश हटवा अशी मागणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे शहर अध्यक्ष राजेश मिश्रा यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी राहुल कराडे,तरुण बगेरे, मंगेश काळे,गजानन बोराळे, पंकज जायले, प्रमोद धर्माळे,अनिल परचुरे ,आशुतोष मिश्रा ,रवी मडावी ,योगेश गीते ,चेतन मारवाल वं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या