Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेचा आज पाचवा दिवस

अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेचा आज पाचवा दिवस


अकोला जिल्हा पोलीस दलात एकुण १९५ 'पोलीस शिपाई 'पदाकरीता भरती प्रक्रिया सुरु असुन आज दिनांक २४.६.२०२४ रोजी पोलीस भरती करीता सकाळी ५.०० वाजता उमेदवारांना पोलीस मुख्यालय अकोला येथे शारीरीक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यामध्ये आज रोजी बोलाविण्यात आलेल्या १५०० उमेदवारांपैकी १०७२ उमेदवार हजर झाले. हजर झालेल्या उमेदवारांची सर्वप्रथम कागदपत्र पडताळणी करण्यात आली, त्यानंतर छाती व उंची चे मोजमाप करण्यात आले. त्या मध्ये कागदपत्र पडताळणी, छाती व उंची मध्ये १२३ उमेदवार अपात्र झाले. पात्र उमेदवार यांची सर्वप्रथम १०० मीटर धावण्याची चाचणी व गोळा फेक चाचणी ही पोलीस मुख्यालय अकोला येथील कवायत मैदानावर घेण्यात आली व त्यानंतर १६०० मीटर धावण्याची चाचणी ही वसंत देसाई स्टेडीयम अकोला येथे घेण्यात आली.


पोलीस भरती करीता आदल्या दिवशी बाहेरगावावरून आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणुन रात्रीला राहण्याची व्यवस्था राणी महल, पोलीस लॉन, अकोला येथे निःशुल्क स्वरूपात करण्यात आली आहे. तसेच मैदानावर चाचणी दरम्यान पाणी, शौचालय, रूग्णवाहिका, इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या