ट्रक कारची समोरासमोर धडक अनर्थ टळला
पातुर वाडेगाव मार्गावरील चान्नी फाटा जवळील घटना
सविस्तर बातमी येथे 👆 पहा....
प्रतिनिधी नासीर शेख
बाळापूर पातूर मार्गावर चान्नी फाटा जवळ पुलावरील ट्रक कारची समोरासमोर धडक झाल्याची घटना, शनिवार दि.१८ मे रोजीच्या संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली,या अपघात कार चालक गंभीर झाला असून त्याला उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. वाडेगाव पोलीस चौकी अंतर्गत चान्नी फाटा जवळील पुलावरून पातूरकडून बाळापूर कडे ट्रक क्रमांक जी जे ३६ व्ही ५४८० मध्ये तांदूळ भरलेल्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडी क्रमांक एम एच ४६ बी क्यू ०५८३ ही गाडीला धडक देऊन पुलावर लटकली होती.कार मध्ये असलेले शेख अमीर व हसिफ शहा दोघे राहणार रिसोड जिल्हा वाशीम हे दोघे कार मध्ये अडकले होते.
अरुंद पुलाला कठडे नसल्याने अपघात झाला तर अपघात मूळे दोन्ही बाजूने दीड ते दोन किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी उपस्थित असलेले मनीष इंगळे, अतुल महल्ले,विजय सोळंके,जीवन इंगळे,कपिल इंगळे,महेश उजाडे रोहन वेलकर ,दामोदर उजाडे,राहुल इंगळे, निलखंठ अरखराव आदी घटनास्थळी पोहचून कार मध्ये अडकलेले दोघांना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले,यावेळी रुग्णवाहिकाचे डॉ. मोहम्मद शहजन, सचिन वरोकार,शेख शहजाद ,विठ्ठल नळकांडे..आदीनी जखमींना तत्काळ उपचारासाठी हलविले.यावेळी चौकीचे समाधान रिठे,पोलीस कर्मचारी विनायक पवार,आदी वाहन चालक मदतीला धावून आले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या