Ticker

6/recent/ticker-posts

अखेर ती ममता बियर शॉपी आजपासून उघडली, बियर शॉपी अवैध ठरविण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला होता प्रयत्न

अखेर ती ममता बियर शॉपी आजपासून उघडली, बियर शॉपी अवैध ठरविण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला होता प्रयत्न 



अकोला. शहरातील सिंधी कॅम्पभागात सर्व वैध कागदपत्रे, परवाने घेऊन सुरु असलेली ममता बियर शॉपी हे दुकान अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाने अवैध ठरविण्याचा प्रयत्न करताना अकोला जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून गैरकायदेशीर कारवाई केली होती. या प्रकरणी ममता बियर शॉपी चे संचालक ए जि दुर्गीया यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाई गैर कायदेशीर असल्याचा आरोप केला होता. ती बियर शॉपी आज संध्याकाळी ७ वाजता पासून अधिकाऱ्यांनी उघडून दिली आली असल्याची 
माहिती बियर शॉपी चे संचालक ए जि दुर्गीया यांनी दिली आहे.
 

ममता बियर शॉपी ही स्वतःच्या जागेत रीतसर सर्व कागदपत्रे आणि शासनाचे आवश्यक ते परवाने घेऊन सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवान्यांचे नुतनिकरण करण्यासाठी रीतसर सर्व कागदपत्रेसह चॅलान भरून प्रस्ताव मुदतपूर्व दाखल केलेला आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत नुतनिकरण करून न देता उलट १० एप्रिलला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे प्रमोद कांबळे , बि जि भगत, व शेगोकार सह इतर कर्मचारी बियर शॉपी मध्ये आले आणि कागदपत्रे मागितले. त्यावर बियर शॉपी संचालकांनी आपल्याच. कार्यालयात नुतनिकरण प्रस्ताव दाखल केल्याची ओ.सी. दाखवली. त्यामुळे त्यांची अडचण झाली म्हणून उद्या ऑफिसल या असे सांगत पैश्यांची मागणी केली. मात्र आपले सर्व कागदपत्रे व परवाने वैध असतानाही त्यांची पैश्यांची मागणी कां पूर्ण करावी म्हणून पैसे देण्यास नकार दिल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यालयात बियर शॉपी संचालकांची २ कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करत १२ एप्रिलला कारवाई केली. कारवाई करताना बियर चा माल जप्त करीत दुकानाला सील ठोकले. अशी माहिती बियर शॉपी संचालक दुर्गीया यांनी पत्रकारांना दिली होती.या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी कागदपत्रे तपासणी करून ही वैध असल्याचे समाधान झाले असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील उघडण्याची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली होती. ती मागणी अखेर आज दिनांक १७ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता पूर्ण झाली असून आज पासून ममता बियर शॉपी ग्राहक सेवेत रुजू झाली आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या