Ticker

6/recent/ticker-posts

निलंबित हवलदाराकडून पीडीतेच्या पतीला धमकी, हवालदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

निलंबित हवलदाराकडून पीडीतेच्या पतीला धमकीहवालदाराविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : चान्नी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन निलंबित हवलदाराने पीडीतेच्या पतीला पाहून कॉलर उडवत तुला पाहून घेईल अशी धमकी दिल्याचा प्रकार पातुर पोलीस स्टेशन समोरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, याप्रकरणी पीडीतेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून पातुर पोलिसांनी २७ मे रोजी निलंबित हवलदार बाळकृष्ण येवले यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. चान्नी पोलीस स्टेशनचे तत्कालीन हवलदार बाळकृष्ण येवले यांनी परिसरातील एका गावातील विवाहितेचा विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी तत्कालीन निलंबित हवलदार बाळकृष्ण येवले यांच्याविरुद्ध ११ रोजी चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. नंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या