‘लसणावर’ चोरट्यांनी केला हात साफ ... शहर पोलिसांची दबंग कारवाई अवघ्या काही तासात दोन चोरट्यांना केली अटक
मुर्तीजापुर : एरवी लसूण म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येतं. त्यातच याचे सध्या बाजारात त्याला चांगलीच मागणी असल्यामुळे त्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. आता भुरटे चोर देखील सोन्या-चांदीपेक्षा लसूनला जास्त पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रख्यात आलू कांदे लसन अद्रक चे ठोक व चिल्लर विक्रेता माणिकराव अवधूतराव खळबडकर यांच्या आठवडी बाजारातील गोडाऊन मधून चार लसणाच्या कट्ट्यांची चोरी झाल्याची घटना 27 मे च्या रात्री घडली.तब्बल 35 हजार किंमतीचा लसूण आहे. यातील दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुर्तीजापुर शहरातील आठवडी बाजारपेठेत ठोक व किरकोळ भाजी विक्री करणारे माणिकराव अवधूतराव खळबडकर यांनी नेहमीप्रमाणे लसणाचा मालाची गाडी बोलावून सोमवारी 27 मे च्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या गोडाऊन मध्ये उतरवला होता.त्यात विद्युत पुरवठा सुद्धा खंडित होता. त्यानंतर ते आपापल्या घरी निघून गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी मंगळवार बाजाराचा दिवस असल्याने सकाळच्या सुमारास आपले गोडाऊन वर आले असता त्यांना आपल्या गोडाऊन मध्ये रात्री उतरवलेले लसणाचे कट्टे दिसत नसल्याचे लक्षात आले. यामध्ये चार लसणाचे कट्टे वजन प्रत्येकी 50 किलो अंदाजे 35000 चा लसूण चोरीला गेल्याचे समजताच त्यांनी मुर्तीजापुर शहर पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.यावरून शेअर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप. नं.218/ 24 कलम 378 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खाक्या दाखवताच गुन्हा कबूल
त्या विक्रेत्यांचे तक्रार ऐकून घेताच मुर्तीजापुर येथील पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी त्याची तत्काळ दखल घेत शहर पोलिसांचे एक पथक तयार करून संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यास सुरवात केली. यामध्ये मुर्तीजापुर शहरातील घरकुल परिसरातील आरोपी दानिश उर्फ राजा फिरोज खान व इम्रान खान नासिर खान या दोघांनी लसनाची चोरी केल्याचे उघड झाले.पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच, त्या दोन आरोपींनी गुन्हा कबूल देखील केला. यातील तिसरा आरोपी ज्याच्या गाडीमध्ये लसणाचे कट्टे नेले तो फरहान याला अटक करणे बाकी आहे.या तिघा आरोपींमधून दानिश उर्फ राजा फिरोज खान याच्यावर याआधी सुद्धा मोटरसायकल चोरी,गोवंश जनावर चोरी,कोंबड्या चोरीसारखे गुन्हे दाखल आहे.
पोलिसांचे सर्वस्तरातून होतेय कौतुक मागील काही दिवसांपासून मुर्तीजापुर परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. परंतु पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुर्तीजापुर शहर पोलिसांनी या चोरी स्तरावर चांगलेच नियंत्रण मिळवून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण कमी केले होते. मात्र, आज झालेल्या चोरीच्या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलिसांनी कमालीचे चक्र फिरवून मोठ्या 'शिताफीने दोन्ही आरोपीना अवघ्या काही तासात जेरबंद केले. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल होण्याआधीच पोलिसांनी आरोपींना अटक केल्यामुळे तर शहर पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या गुन्ह्याच्या तपासात निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पांडे,सचिन दुबे,मंगेश विल्हेकर, गजानन खेडकर,सचिन दांदळे आदींनी पुढाकार घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासाच्या आत सदर चोरीचा छडा लावला.
शहर पोलिसांनी शहरात गस्त वाढवली. मुर्तीजापुर शहरातील भुरट्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही पोलिसांचे एक पथक तयार केले असून योग्य ते बदलदेखील करण्यात आले आहेत. तसेच शहरात रात्रीची गस्त वाढविण्यात आली असून आठवडी बाजार तसेच इतर काही वर्दळीच्या ठिकाणीदेखील पोलिसांची विशेष नजर ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले पाहिजे. - भाऊराव घुगे, पोलिस निरीक्षक, मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या