Ticker

6/recent/ticker-posts

अंध विद्यार्थी जयकुमार रवींद्र चव्हाण यांनी जोपासले सामाजिक दायित्व अंध विद्यार्थ्यांसाठी ठरले देवदूत

अंध विद्यार्थी जयकुमार रवींद्र चव्हाण यांनी जोपासले सामाजिक दायित्व अंध विद्यार्थ्यांसाठी ठरले देवदूत


संपूर्ण जिल्ह्यातील अंध विद्यार्थ्यांना पुरविले रायटर - लेखक

 प्रतिनिधी - राहुल खाडे 
अकोला -अंध विद्यार्थ्यांचे जीवन हे सर्वसामान्य विद्यार्थ्यासारखं व्हावं व अंध विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनाव यासाठी विविध क्षेत्रांमध्ये अंध विद्यार्थी शिकत असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून त्यांना रायटर/लेखक मिळवून जयकुमार रवींद्र चव्हाण यांनी त्यांची मदत केली आहे. त्यापैकी रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालय अकोला येथे इयत्ता अकरावीत शिकत असलेला विद्यार्थी विश्वदीप रवींद्र गेठे याने रायटर म्हणून सीताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला येथील इयत्ता बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थी प्रथमेश सुरेश डिकर या अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल पुस्तकाच्या साहाय्याने संपूर्ण बारावीच्या विषयाचे अध्ययन करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे त्यावेळी प्रथमेश सुरेश डिकर चा रायटर विश्वदीप रवींद्र गेठे होता. त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांना आलेला अनुभव त्यावेळेस त्यांनी व्यक्त केला आहे. मनोगत व्यक्त करत असताना त्यावेळेस त्यांनी संपूर्ण अंध बांधवांना सर्वसामान्य मुलांची मदत केली पाहिजे यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी त्यावेळेस सांगितले.


या सर्व विद्यार्थ्यांनी रायटर म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांची केली मदत-

१ वैष्णवी मानकर
२ अंजली जाधव
३ मयूर सुधाकर पटके 
४ आदेश बाबाराव पाखरे 
५ विश्वदीप रवींद्र गेठे


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या