केजरीवाल यांना दिला १ जून पर्यंत जामिन, अकोल्यात आप ने केले निर्णयाचे स्वागत , केला जल्लोष
अकोला दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती त्या अटकेला आव्हान देणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाचे अकोला आम आदमी पार्टीने स्वागत करीत जल्लोष केला आहे.
सुप्रीम कोर्टात अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याची माहिति अकोल्यात पोहचताच अकोला आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष कैलास प्राणजाळे, महानगर संयोजक मकसूद खान यांच्या नेतृत्वात पार्टीचे कार्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर एकत्र येऊन जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी ढोल ताशे च्या निनादात आणि फटका्यांची आतिशबाजी करीत एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष केला यावेळी विजय चक्रे, अरविंद कांबळे, सुगदेवरावं गोपनारायण, काजी लायक अली,ज्ञानेश्वर साखर कर, प्रमोद मेश्राम, संतोष दाभाडे, गजानन भटकरसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या