Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी महोदया,यांनी राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजनेच्या नविन लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी. -संजय कडोळे

जिल्हाधिकारी महोदया,यांनी राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन योजनेच्या नविन लाभार्थ्यांची यादी जाहीर करावी. -संजय कडोळे


 वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून, राज्यातील कलेवर रोजीरोटी अवलंबून असणाऱ्या वयोवृद्ध साहित्यीक आणि लोककलावंताच्या सन्मानार्थ त्यांच्या वृद्धापकाळाच्या उदरनिर्वाह व औषधोपचारा करीता "राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन योजना" कार्यरत असून या योजनेतून कलाकारांना सरसकट दरमहा पाच हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील हजारो गरजू वयोवृद्ध कलाकारांनी शासन नियमाला अधिन राहून 2018-19 पासून आपले प्रस्ताव पंचायत समित्यांमार्फत,समाज कल्याण विभागाकडे सादर केले होते.परंतु चालू पंचवार्षिक मध्ये "वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती" स्थापन न झाल्याने, गेल्या पाच वर्षात गरजू वयोवृद्ध कलाकारांना मानधन मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाच्या वेळोवेळीच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मार्गदर्शनात शासकीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून, गरजू वयोवृद्ध कलाकारांचे प्रस्ताव निकाली काढून मानधन मंजूर करण्याबाबत लेखी पत्रातून निर्देष केलेले होते.त्याशिवाय विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी प्रजासत्ताक दिनाचे पूर्वसंध्येला दि 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमच्या प्रांगणात हजारो सहभागी कलावंताच्या साक्षीने लक्ष्यवेधी निर्णायक धरणे आंदोलनही केले होते.अखेर जिल्हाधिकारी वाशिम यांनी - अधिकाऱ्याच्या समित्यांचे गठन करून, कलावंताना लेखी पत्र देवून त्यांना प्रत्यक्ष मुलाखती करीता वाशिम येथे बोलवून घेत दिनांक 04 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 पर्यंत सामाजिक न्याय भवन वाशिम येथे वृद्ध साहित्यिक कलाकारांचे सादरीकरणही घेतले. व सादरीकरण घेऊन दोन महिने पूर्ण झाली आहेत.


त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून मानधन मंजूरीची प्रतिक्षा करीत असलेल्या वृद्ध कलावंताच्या अपेक्षा वाढल्या असून कलावंत नविन मानधन लाभार्थ्याची यादी केव्हा लागणार ? केव्हा एकदा मंजूर लाभार्थ्यांची नावे जाहीर होणार ? याची डोळे लावून प्रतिक्षा करीत आहेत.प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय, समाजकल्याण जिल्हा परिषद वाशिमच्या फेऱ्या करून पायपिट करीत आहेत.परंतु उन्हातान्हात खेडेगावातून खिशाला झळ देवून येणाऱ्या वयोवृद्ध कलावंताना थातुर मातुर उत्तरे देवून त्यांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे सन्माननिय जिल्हाधिकारी बुवनेश्वरी देवी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वैभवजी वाघमारे सरांनी या विषयाकडे गांभिर्याने लक्ष्य देवून नव्याने मंजूर करण्यात आलेल्या वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन लाभार्थ्यांची यादी एकदाची जाहीर करून कलाकारांना दिलासा द्यावा ही हात जोडून विनंती आहे.अशी कळकळीची मागणी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.


"सांस्कृतिक विभागाच्या मानधनासाठी,गेल्या पाच वर्षातील प्रलंबीत असलेल्या लोककलावंताचे अर्ज निकाली काढण्याकरीता घेण्यात आले होते कलावंताचे सादरीकरण. व मुलाखती.परंतु सादरीकरणाला दोन महिने उलटले,तरीही मंजूर लाभार्थ्याची यादी जाहिर झालेली नाही त्यामुळे ही यादी जाहिर केव्हा होणार ? याकडे जिल्हावासी गरजू लोककलावंताचे लक्ष्य लागले असून गेल्या पाच वर्षात प्रस्ताव सादर केलेली कलावंत मंडळी मानधनाच्या आशेने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात फेऱ्या मारण्याची पायपिट करीत आहेत."


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या