योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील सभा रद्द.. परंतु होणार अमित भाई शहा यांची विशाल सभा
दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहेय. 21 एप्रिलला अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती मात्र योगी यांनी या सभेकडे पाठ फिरवली आहेय. अकोल्यातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणारी त्यांची 21 एप्रिल ची सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेकरिता गेल्या तीन दिवसांपासून भाजप तर्फे मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र एन वेळेवर ही सभा रद्द करण्यात आली आहेय.
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अद्यापही भाजपचे कोणतेही मोठे नेते अकोल्यात आले नाही हे विशेष. योगी आदित्यनाथ यांची ही सभा कोणत्या कारणाने रद्द करण्यात आली याच स्पष्ट उत्तर भाजपकडून मिळालं नसून योगी आदित्यनाथ यांनी बऱ्याच सभा रद्द केल्या असल्याचा कारण समोर येत आहेय.
भाजपाच्या अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ 400 पार करण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला अकोल्यात
अकोला - भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दि. 24 एप्रिलला स्थानिय अकोला क्रिकेट क्लब येथे जाहीर सभा घेणार आहेत.
त्यासोबत दि. 22 एप्रिल रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अकोला, तेल्हारा, वाडेगांव येथे विविध ठिकाणी बैठका घेऊन सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेणार आहेत.
तसेच दि. 23 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांची अकोट येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभांना प्रचंड प्रमाणात जनतेनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या