शेतकरी संघाचे सचिन कोरडे यांचा जाहीर पाठिंबा
अकोला
शेतकऱ्यांच्या हितार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय होत असून केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य चे राज्य समन्वयक सचिन गजानन कोरडे यांनी भाजपा महायुतीचे अकोला लोकसभा मतदारसंघातील युवा उमेदवार शेतकरी ग्रामीण भागाची जाण असणारा उद्योग क्षेत्राशी नाळ जोडणाऱ्या अनुप संजय धोत्रे यांना संघटनेतर्फे आज जाहीर पाठिंबा देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याच्या दृष्टीने केळी उत्पादक शेतकरी जनसंपर्क करून त्यांना विजयी करणार असा विश्वास व्यक्त केला.
त्यांनी आज पत्र भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व महाबीज संचालक मराठा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रणजीत सपकाळ यांना यांना दिले .
यावेळी सचिन कोरडे काशिनाथ कोरडे भास्कर खानझोड अरुण गावंडे दिवाकर वाघ विष्णू खडसे गजानन राठोड समाधान निचळ ज्ञानदेव कोरडे गजानन ताथोड सुशील काठोडे गोपाल कोरडे अरुण चतारे गोपाल वानरे आदींनी पाठिंबा व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या