हदयविकाराच्या झटक्याने सस्ती येथील संजय परनाटे यांचा मृत्यू
प्रतिनिधी नासीर शेख
दुखत बातमी
पातूर : शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांचे मोठे भाऊ संजय दिगांबर परनाटे यांचा हदयविकाराच्या झटक्याने मंगळवार दि. २ एप्रिल रोजीच्या दुपारी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृतदेहावर अंतिमसंस्कार पातुर तालुक्यातील मूळ गावी सस्ती येथे बुधवार दि.३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. मृतकाच्या पश्चात आई-वडील पत्नी मुलगा भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या