Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाचे पदाधिकारी प्रमोदभाऊ पोहरे पाटिल यांचा वंचित बहुजन आघाडी मधे प्रवेश

भाजपाचे पदाधिकारी प्रमोदभाऊ पोहरे पाटिल यांचा वंचित बहुजन आघाडी मधे प्रवेश

#BreakingNews 🚨
भाजपाचे पदाधिकारी तथा प्रदेश सरचिटणीस विदर्भ एस. टी. कर्मचारी संघटनेचे मा. प्रमोदभाऊ पोहरे पाटिल यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. प्रवेशाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलींद इंगळे, पातुर तालुकाध्यक्ष डॉ ओमप्रकाश धर्माळ, मनपा गटनेते गजानन गवई, प्रकाशभाऊ वक्टे पाटील, गोपाल पाटील ढोरे, डॉ. प्रशात इंगळे, मनोहर पंजवानी व सह जिल्हा प्रसिध्दी प्रमुख विकास सदांशिव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

#BreakingNews 🚨
विशाल पाटील सांगली यांचे बंधू माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, अय्याज नाईकवाडी आदी उपस्थित होते.

प्रमोद पोहरे भाजपाच्या कोणत्याही पदावर नव्हते- मचीत राव पोहरे

प्रमोद पोहरे भाजपाच्या कोणत्याही पदावर नव्हते. साधारण सदस्य सुद्धा नव्हते केवळ नावाचा वापर करून वंचित आघाडी जनता जनार्दन यांना सगळं माहित आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही पदावर नसलेल्या व्यक्तीला भाजपात असल्याचे दाखवून आपला उदो उदो करण्याचा वंचित चा प्रयत्न असल्याचा भाजपाचे ओबीसी आघाडीचे प्रमुख मचीत राव पोहरे यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या