Ticker

6/recent/ticker-posts

स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सील बंद, 4 जूनला मतमोजणी, अकोलात लोकसभेसाठी 61.79 टक्के झाले मतदान

स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सील बंद, 4 जूनला मतमोजणी, अकोलात लोकसभेसाठी 61.79 टक्के झाले मतदान


अकोला
अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी प्रशासनाने घोषित केली असून एकूण 61.79 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. बाळापूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.58 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 54.88 टक्के झाल्याची प्रशासनाने दिली आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 56 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यावेळी अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. नवमतदारांमध्ये विशेष उत्साह होता. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम टक्केवारी शनिवार, 27 एप्रिल रोजी प्रशासनाने घोषित केली. यात सर्वाधिक मतदान बाळापूर विधानसभा मतदारसंघात 66.58 टक्के तर सर्वात कमी मतदान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 54.88 टक्के झाले आहे


स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम सील बंद, 4 जूनला मतमोजणी
मतदानामध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनस् चोख पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या एमआयडीसी मधील वखार महामंडळाच्या गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये सील बंद करून ठेवण्यात आले आहे.


सदरची ईव्हीएम मशीन हे थ्री लेअर सिक्युरिटी मध्ये ठेवण्यात आले असून याकरिता सी.एफ. सिक्युरिटी, स्टेट पोलीस सेक्युरिटी तसेच जिल्हा पोलीस सिक्युरिटी अशा प्रकारच्या चोख बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. या सोबतच ईव्हीएम मशीनच्या सुरक्षे करिता 24 तास cctv कॅमेरांची नजर सुद्धा राहणार आहे. 4 जून रोजी होत असलेल्या मतमोजणी पर्यंत सदरच्या ईव्हीएम या सीलबंद अवस्थेत गोदामात सुरक्षित राहणार आहे. तर 4 जून ला याच ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या