Ticker

6/recent/ticker-posts

स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचे अनुप धोत्रे यांनी घेतले दर्शन

स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचे अनुप धोत्रे यांनी घेतले दर्शन 



अकोला
भाजपाला अकोला जिल्ह्यामध्ये यश प्राप्त करून देणारे अकोला जिल्हा कर्मभूमी मानणारे लोकनेते माजी कृषी मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष अकोला लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानी खामगाव येथे जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन श्रीमती सुनिता ताई भाऊसाहेब फुंडकर यांचे आशीर्वाद अकोला लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांनी घेतले व याप्रसंगी सागर , व आमदार आकाश फुंडकर यांनी अनुप धोत्रे व भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे स्वागत केले. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व संजय भाऊ धोत्रे स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा ही जोडी जिल्ह्या त विकास कामात सातत्याने सक्रिय होती व पक्ष विस्तारासोबत भारतीय जनता पक्षाचा विस्तार केला. 


स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांच्या गाडीमध्ये सातत्याने राजकीय क्षेत्राचा अनुभव व सामाजिक अनुभव खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी घेतला व खास भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले वारस म्हणून संजय भाऊ धोत्रे यांची निवड केली त्यांना आमदार केले व सातत्याने पक्ष संघटनेत उपाध्यक्ष सचिव पदावर कार्य करण्याची संधी प्राप्त करून दिली. खासदार धोत्रे व भाऊसाहेब फुंडकर यांच्या परिवारातील संबंध राजकीय क्षेत्राच्या पलीकडे होते व आज त्यांच्या निवासस्थानी देऊन अनेक गोष्टीचा उजाळा होऊन श्रीमती सुनिता ताई फुंडकर यांनी अनुप धोत्रे यांना विजयी होण्याचे आशीर्वाद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिलेदार म्हणून काम करण्याची संधी पक्ष नेतृत्वाने दिल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त केले यावेळी परिवारातील सर्व घटक यांनी स्वागत केले.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या