Ticker

6/recent/ticker-posts

स्त्री सशक्तीकरण, स्त्री ने सर्वांगीणविचार करने आवश्यक- ऍड.सौ माधवी रत्नपारखी

स्त्री सशक्तीकरण, स्त्री ने सर्वांगीणविचार करने आवश्यक- ऍड.सौ माधवी रत्नपारखी


आजची स्त्री खरच सक्षम आहे? खेदाने ह्याचे उत्तर नाही हेच द्यावे लागेल, कारण हे जग 21 व्या शतकाकडे वाटचाल केली अहे पन तरी सुद्धा आजही स्त्रियांवर अत्याचार  घडतांना दिसत असतात,हे अत्याचार थांबविण्या साठी महिलांनीच काही पाऊले उचलण्याची गरज आज आहे. आज महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याला स्त्री सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत, सर्वात आधी स्त्री ने ह्याचा सर्वांगीणविचार करने आवश्यक आहे
 

स्त्री सशक्तीकरण ह्या शब्दाची व्याख्या खूप मोठी आहे ,जेव्हा स्त्री शरीरीक सक्षम वैचारिक सक्षम समाजीक सक्षम बनेल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री सशक्तीकरणपूर्ण झालेअसें म्हणता येईल .पूर्वीच्या काली स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते, स्वतंत्र नव्हते ती आर्थिकदृष्टया सक्षम नव्हती,पण हळू हळू काळ बदलत गेला थोर नेत्यांनी तिला तिचे अधिकार मिळवून दिले,तिला समाजात सन्मान,एक स्थान दिले, सध्याची नारी शिक्षित आहे,प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर अहे अर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आहे,हे जरी खरेअसले तरी सुद्धा ती वैचारिक दृष्ट्या सक्षम अजूनही नाही,फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन गलेलठ्ठ पगाराच्या नौकऱ्या करून स्त्री सक्षम झाली असे म्हणता येणार नाही,स्त्रीने शिक्षित न बनता सुशिक्षित बनले पाहिजे,ती मानसिक रित्या पूर्ण बदलणे गरजेचे आहे, ती वात्सल्य प्रेमी असावी,कुटुंब बद्दल प्रेम, आदर तिच्या अंगी असावा,आदर, नम्रता शालीनता आपली संस्कृती तिने जपावी आपल्या संस्कृतीने घालून दिलेल्या मर्यादा संभाळाव्यात आणि स्त्रीनेच जर आपले संस्कार आपली संस्कृती जपली तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती संस्कारी बनू शकते आणि समाजातील स्त्रीने जर आपली संस्कृती जपली आपल्या मर्यादा सांभाळायला सुरवात केली तर निश्चितच आजचे हे रोज होणारे स्त्रीयांवरील अत्याचार थांबतील, स्त्री नि ह्या सगळ्या गोष्टीं बरोबर तिच्या मधला आत्मविश्वास जागृत होणे गरजेचे आहे,स्त्रिया मधील एकजूट आवश्यक आहे,स्त्री कुठल्याही परिस्थिला निर्भीड पणे सामोरी जाऊ शकेल एवढी ती मनाने सशक्त असणे गरजेचे आहे, आणि ती प्रत्येक दृष्टशक्तीला प्रतिकार करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने स्त्रीचा सण करणे गरजेचे आहे, तिला योग्य आदर देणे हे समाजातील प्रत्येक पुरुषांचे सुद्धा आद्य कर्तव्य आहे,शिवाय स्त्री ला श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातील फरक कळण्या इतपत ती सक्षम होणे गरजेचे आहे, स्त्री आणि पुरुष भेदभाव न होता तिचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक पुरुषांनी आपल्या कुटुंबातील महिलांचा आदर करावा, स्त्री मन जाणून घेणे गरजेचे आहे,त्यांच्या मधील आत्मविश्वास जगृत करण्या समाजाने त्यांना पुढे आणावे, म्हणूंच स्त्री फक्त शिक्षित असून चालणार नाही तर तीची वैचारिक क्षमता उंचावणे गरजेचे आहे. जेव्हा स्त्रीचा सर्वांगीण विकास होईल तेव्हाच स्त्री पूर्ण सबलीकरण झाले असे म्हणता येईल,आणि खऱ्या अर्थाने समाजातील ज्या थोर नेत्यांनी महिलांना अधिकार मिळवून दिले, त्यांना एक समाजात स्थान दिले त्या थोर नेत्यांना खरी आदरांजली मिळेल.
       

     

महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या