लिपिकाने जन्म तारखेत केला बदल : शासनाची दिशाभूल
झरंडी येथील लीपिकाचा प्रताप , शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार
प्रतिनिधी : नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील झरंडी येथील रहिवासी शांताराम हंजारी जाधव, हे पातुर शहरातील वसंतराव नाईक विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत असून, त्यांनी जन्म तारखेत बदल करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप झरंडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष राठोड यांनी १२ फेब्रुवारी रोजी माध्यमिकच्या शिक्षण अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे. त्या लिपिकाच्या बरोबरीचे कर्मचारी दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले, तसेच त्यांचे दोन लहान भाऊ त्यांचे वय ५८ ते ६० वर्षाचे झाले, तरीही लिपिक शांताराम हंजारी जाधव, हे सेवानिवृत्त झाले नाही, शासनाची फसवणूक करणाऱ्या लिपिकाच्या जन्म तारखेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुभाष राठोड यांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे.
लिपिक शांताराम हंजारी जाधव यांची चुप्पी
लिपिक शांताराम हंजार यांनी जन्म तारखेत बदल करून शासनाची दिशाभूल केल्याबाबतच्या तक्रारीवर त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले असून, चुप्पी सादली आहे.
लीपिकावर कारवाई की अभय ?
लिपिकाने जन्म तारखेत बदल करून शासनाची फसवणूक करून लाखो रुपये लाटले, या लिपिकाला अभय कोणाचे आहे. अशी चर्चा परिसरात आहे.यावर शिक्षणाधिकारी काय कारवाई करते याकडे तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या