अकोला लोकसभा निवडणूक प्रभाग निहाय महिला बैठक
आदरणीय सुहासिनीताई धोत्रे, मंजुषाताई सावरकर,पुष्पाभाभी खंडेलवाल, अर्चनाताई मसने, सीमाताई मांगटे पाटील, सुनिता भाभी अग्रवाल,अर्चनाभाभी शर्मा ,समीक्षा ताई धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत "अकोला लोकसभा निवडणूक प्रभाग निहाय महिला बैठकी" चे आयोजन करण्यात आलेले आहे.
लोकसभा निवडणूक प्रचार दौरा मंडळनिहाय सुरू झालेला असून पश्चिम उत्तर मंडळामध्ये दिनांक 23 मार्च 2024 रोजी सौ.रंजना विंचनकर यांच्या घराजवळ,आश्रय नगर, डाबकी रोड, सौ.चारुशीला ढगे यांच्या घराजवळ ,शिवाजी नगर, डाबकी रोड तसेच सौ.वैशालीताई शेळके यांच्या घराजवळ,रेणुका नगर,डाबकी रोड, अकोला या तीनही ठिकाणी अतिशय उत्साहात व विक्रमी मताधिक्याने लोकसभा उमेदवार श्रीअनुप भाऊ धोत्रे हेच निवडून येतील या सुमारे 1480 महिलांच्या विश्वासाने बैठक पार पडली. उपस्थित महिलांना आदरणीय सुहासिनीताई धोत्रे आणि अर्चनाभाभी शर्मा यांनी लोकसभा निवडणुकीचे महत्त्व सांगून सर्व महिलांना मतदार यादी मध्ये आपले नाव तपासण्यास सांगितले तसेच जास्तीत जास्त महिलांनी मतदानाच्या दिवशी मतदान करून आपला हक्क बजावण्यास सांगितले.
कार्यक्रमासाठी आदरणीय सुहासिनीताई धोत्रे,मंजुषाताई सावरकर,भारतीताई धरपडकर, अर्चनाताई मसने,अर्चनाभाभी शर्मा, समीक्षाताई धोत्रे, सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा, गीतांजलीताई शेगोकार, शुभांगीताई कुलकर्णी, नाकट मावशी,सपनाताई नवले, गायत्रीताई गोगे, अर्चनाताई काळे,सुनिताभाभी अग्रवाल, वैशालीताई शेळके, सारिकाताई जयस्वाल आणि रंजना विंचनकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
होळीचे औचित्य साधून उपस्थित महिलांना होळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच सर्व ठिकाणी फुलांची व पर्यावरणपूरक रंगाने होळी व रंगपंचमी साजरी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी कायंदे तर प्रास्ताविक वैशालीताई शेळके, रंजनाताई विंचनकर आणि चारुशीला ताई ढगे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन साधना येवले व ज्योती मानकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशालीताई शेळके,रंजनाताई विंचनकर, माधुरीताई क्षीरसागर, रश्मीताई कायंदे, सुनीताताई दळवी,साधनाताई येवले, विजयाताई देशमुख, सोनलताई शर्मा, ज्योतीताई मानकर आणि चारुशीलाताई ढगे या सर्व पश्चिम उत्तर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या